नवे एसपी येताच : कारवायांचा धडाका सुरु
प्रतिबंधित अवैध तंबाखूजन्य पदार्थांवर परळीच्या गावभागात कारवाई:40 हजार रुपयांचा माल ताब्यात
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेले तंबाखू, पानमसाला, गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या कारवाईत गावभागात किरायाने राहणाऱ्या एका व्यक्तीकडून बेकायदेशीर अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थ जवळ विक्रीच्या उद्देशाने बाळगले म्हणून चाळीस हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार जुन्या गावभागातील अंबेवेस परिसरात महेश मनोहर बलशेटवार हे किरायाने राहतात. त्यांच्याकडे राज्यामध्ये प्रतिबंधित असलेले तंबाखू, पान मसाला, गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थ अवैध विक्रीसाठी साठवलेला असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला.या कारवाईत संबंधित इसमाकडे एकूण 40652 रुपयांचा माल आढळून आला. हा माल पुरवठा करणारा कोण याची चौकशी केली असता गफार काकर हे नाव त्यांनी सांगितले. याप्रकरणात हा माल जप्त करून पोलीसांनी महेश मनोहर बलशेटवार व गफार काकर (फरार) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि शिंदे हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा