✍️ डॉ.चंद्रकांत लोखंडे यांचा प्रासंगिक लेख >>>>अद्वितीय लोकनेता ; अविस्मरणीय नेतृत्व: गोपीनाथराव मुंडे

अद्वितीय लोकनेता ; अविस्मरणीय नेतृत्व: गोपीनाथराव मुंडे

  दरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची आज अमृत महोत्सव जयंती  आहे. साहेबांचा जन्म १२ डिसेंबर १९४९ रोजी कार्तिकी र्पोर्णिमेच्या मध्यरात्री एका शेतकरी कुटुंबात झाला.त्यावेळी भविष्याबद्दल तो भारत सरकारचा केंद्रीय मंत्री होऊ शकतो असे जर त्यावेळी कोणी म्हटले असते, तर त्यावेळी ही बाव हास्यास्पद ठरली असती. परंतु ही अशक्यप्राय गोष्ट लोकनेते. गोपीनाथराव मुंडे यांनी प्राप्त केली.

         कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशाच्या नेतृत्वाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. नेतृत्व हे जर दुर्बल, दृष्टीहीन लाभले तर विकास होत नाही. पोकळ नेते, शौर्याचे प्रदर्शन करतात आणि त्यांच्या कर्तृत्वाचे वचन देतात परंतु जेव्हा कामाची वेळ असते तेव्हा ते शिळे पडतात. लोकनेते मात्र वचन न देता सर्वकाही करतात आणि कर्तबगारी बदल ब्र ही काढत नाहीत . 'समुहातील लोकप्रिय व्यक्ती म्हणजे नेता' अशी व्याख्या केली आहे. ती व्याख्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना सार्थ ठरते.

        साहेबांनी असंख्य आयुष्य घडवलेल्या त्यापैकी अनेकजन देशाच नेतृत्व करतात. तर कहीजन महाराष्ट्राचे नेतृत्व करतात . त्यात वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस जी हे सुद्धा साहेबांच्य वटवृक्षा खाली वढलं असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

     मला आज ही तो दृढनिश्चयी आवज जशा तशासते स्मरणात आहे 

' मी उतणार नाही

मातणार नाही,

घेतलेला वसा,

टाकणार नाही'

        हे शब्द परळीकरांना ऊर्जा देऊन जात असत, परळीकर साहेबांना टाळ्यांच्या गजरात अभिवादन करायची असे माझे साहेब होते. ते अनेकांचे श्रीकृष्ण होते अनेक अर्जुन घडवले. त्यांना म्होरक्या म्हणून मिरवण्यात अभिमान नव्हतं संवगडी म्हणून राहण्यात जास्त रस होता. त्यांना सत्तेचा घमंड कधी आला नाही गरजूवंतांच्या मदतीला नेहमीच पुढे सरसवले असे माझे साहेब होते. ते यदुवंशी कृष्णा सारखे अखंडतेने संघर्षात वाढली शकुनी सारख्या प्रवृत्तींना संपवण्यात व कंसासारखे प्रवृतींचा नायनाट करण्यासाठी झगडले. साहेब कधी सत्तेसाठी धडपडली नाहीत मात्र सामान्यांसाठी उभा राहिले

      देशात आणिबाणीची लाट पसरल्यामुळे महाराष्ट्र सरकारने अटक सत्र सुरू केले. साहेबांना १६ महिन्यांचा करावास झाला. पुढे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी तुरुंगवास भोगला तर उर्दू भाषेच्या सन्मानासाठी संसदेत भांडले. असे सर्वांगीण विचार करणार लोकनेते म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेबच असू शकतात. 

      गोरगरिबाच्या मुलांनीही इंजिनियर व्हावे म्हणून इंजिनिअरिंग कॉलेज उभारले. ऊसतोड कामगारांनी ही साखर कारखान्यात भागीदार खूप म्हणून साखर कारखाना उभारला.जेवढे ताकतीने या मागास क्षेत्राचा विकास करता येईल तेवढ्याच ताकतीने ते करत राहिले. जेवढे ताकतीने या मागास क्षेत्राचा विकास करता येईल तेवढ्याच ताकतीने ते करत राहिले. असे सर्वांगीण विचार करणार लोकनेते म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेबच असू शकतात. लोकभिमुख योजनेसाठी साहेब सदैव पुढाकार घेत असे ज्यामुळे लोकांचे कल्याण होऊन हीच त्यांच्या मनी संकल्पना असे. साहेबांचा अंश पंकजाताई आणि प्रीतम ताई यांच्या माध्यमातून आजही परळीच्या विकासासाठी झगडताना दिसतो. नामदार धनंजयजी मुंडे साहेबांची कार्यपद्धती पाहिल्यावर साहेबांची चुणूक त्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते. साहेबांच्या विचारांची ध्वजा आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी खांद्यावर आहे. ती सदैव कार्यरत असेल हेच साहेबांना खरं अभिवादन असेल. 

✍️....लेखक- डॉ.चंद्रकांत लोखंडे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार