MB NEWS Effect:'त्या' वक्तव्यावरून खासदाराचा माफीनामा !
पत्रकारांच्या भावना दुखावणे हेतू नव्हता, दिलगीर आहे- खा. बजरंग सोनवणे
"आ. संदीप क्षीरसागर यांच्या नागरी सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त करत असताना माझ्याबाबत संशय निर्माण करणारी बातमी कुणाला संशय आला म्हणून केल्याचे आपण विचारले. केज विधानसभा मतदार संघात जीवाचे रान करत प्रचार केला व प्रचार यंत्रणा सांभाळली असे असताना माझ्या भूमिकेवर संशय निर्माण करणारी ती विशिष्ठ बातमी माझ्या सारख्या कार्यकर्त्यास अत्यन्त मनस्ताप देणारी ठरली. यातून सदरील पत्रकार मित्राकडे तक्रारवजा बोलताना संशय आपणास का घरच्या कुणाला आला असे आपणा सर्वांशी असलेल्या कौटुंबिकपणाच्या भावनेतून अनावधानाने म्हटले गेले. यावेळी उल्लेख केलेल्या शब्दानी कुणाच्या भावना दुखाव्यात असा माझा अजिबात हेतू नव्हता. मात्र याने माझ्या राजकीय प्रवासात माझ्या सोबत कायम राहिलेल्या माझ्या अनेक सहकारी मित्रांचे मन दुखावले. अशा सर्व माझ्या मित्रांकडे मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या पत्रकार मित्राना दिलगिरी सोबतच हे आवाहन करतो की आपण माझे टीकाकार/सल्लागार आहात. मी टिकेचे आणि सल्ल्याचे नेहमी स्वागतच करत आलोय. पुढेही करणार आहे. मात्र आपल्यातीलच कोणी ठरवून बदनामीकारक किंवा संशय निर्माण करणारे वार्तांकन विशेषकरुन निवडणूक काळात करत असतील तर आपण पत्रकार म्हणून अशा मित्रांना योग्य मार्गदर्शन करावे. मला विश्वास आहे आज ज्या प्रमाणे माझ्याकडे आपण व्यक्त झालात असेच भविष्यात चुकीच्या बातमीला बंधन घालाल. माझ्या वक्तव्याने कुणाचे मन दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करत आहे."
अशा शब्दात खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकारांची माफी मागितली आहे. बजरंग सोनवणे यांनी पत्रकारांबद्दल बोलताना वादग्रस्त विधान करत त्यांची बायका पोरं काढली होती. या प्रकाराबद्दल आपण सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो असे खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
नेमकं पत्रकारांबद्दल खासदार बजरंग सोनवणे काय बोलले होते👇👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा