परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 एमकेसीएलच्या वतीने परळी वैजनाथ च्या विजय कॉम्प्युटर्स चा पुरस्काराने गौरव


परळी वैजनाथ: महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) च्या वतीने बीड जिल्ह्यातून MKCL विविध क्लिक कोर्स चे  २०२४  मध्ये सर्वात जास्त प्रवेश नोंदविले ” या साठी  छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या वार्षिक सभेत परळी वैजनाथ येथील अजयकुमार सावजी यांच्या विजय कॉम्प्युटर्स  ला जिल्ह्यातून द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

एमकेसीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका वीणा कामथ यांचे हस्ते  विजय कॉम्प्युटर्स चे संचालक अजयकुमार सावजी यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. गेल्या २० वर्ष्या पासून परळी वैजनाथ परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम घडविण्याचे काम सातत्याने विजय कॉम्प्युटर्स च्या माध्यमातून केले जाते. या मुळे दरवर्षी एमकेसीएल कडून सातत्याने विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. यावेळी महामंडळाचे अमित रानडे, अतुल पतौडी, दीपक पाटेकर विभागीय समन्वयक बालकिशन बलदवा, गजानन कुलथे लोकल लीड सेंटरचे विठ्ठल पांचाळ हे उपस्थित होते.या मिळालेल्या पुरस्काराबद्दल अजयकुमार सावजी यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!