Proud of you Maa : पंकजा मुंडे मंत्री झाल्यानंतरची 'ही'भावूक पोस्ट चर्चेत!
● परळी वैजनाथ ●
Proud of you Maa असे म्हणत पंकजा मुंडे मंत्री झाल्यानंतरची 'ही'भावूक पोस्ट चर्चेत आली आहे.ही पोस्ट सोशल मीडियातून केली आहे बीडच्या विक्रमादित्य माजी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांची. या अभिनंदनाच्या पोस्ट सह त्यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.
लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात भाजप नेत्या प्रितम मुंडे यांचं तिकीट कापून त्यांची बहीण पंकजा मुंडे यांना उमदवारी देण्यात आली होती. मात्र बीडमधील सामाजिक आणि राजकीय परस्थितीचा फटका बसल्याने पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. मात्र, प्रितम मुंडे यांची जागा पंकजा मुंडे यांना देण्यात आल्यामुळे त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार का? अशी चर्चा सुरु होती. प्रितम मुंडे यांचे लोकसभेचे तिकीट कापले गेले, त्यानंतर त्यांना आमदारकी किंवा राज्यसभेवर संधी मिळणार का, असा प्रश्न निर्माण होत होता. मात्र, विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना संधी देण्यात आली नाही. मात्र प्रीतमताई मुंडे यांनी कधीही अशा प्रकारची आकांक्षा जाहीरपणाने व्यक्त केलेली नाही.
दरम्यान पंकजाताई मुंडे यांना भाजपाने विधान परिषदेवर घेतले. आता त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीही केले आहे. त्यामुळे सर्व स्तरातून आनंद व अभिनंदन व्यक्त केले जात असतानाच बीडच्या विक्रमादित्य खासदार म्हणून ओळख असलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी आपल्या बहिणीसाठी विशेष अशी अभिनंदन करणारी अशी पोस्ट सोशल मीडियातून केली आहे. डॉ. प्रीतम मुंडे नेहमीच पंकजा मुंडे यांचा उल्लेख 'माॅ' असा करतात. त्याच शब्दाचा उपयोग करत यावेळीही त्यांनी अभिनंदनची पोस्ट केली असून पंकजाताई नव्हे तर आम्हीच मंत्रीपदाची शपथ घेतल्याची अनुभूती आम्हाला होत असल्याचा यथार्थ अन्वयार्थ त्यांनी या पोस्ट मधून व्यक्त केला आहे. त्याचबरोबर वंचित, उपेक्षित, समाज घटकांचा सेवा कार्याचा यज्ञ यापुढेही सुरूच ठेवून यापूर्वी पेक्षाही व्यापक पद्धतीने आपल्या हातून काम घडावे अशा शुभेच्छाही त्यांनी या पोस्ट मधून दिल्या आहेत.
● अशी आहे डाॅ. प्रितम मुंडे यांची पोस्ट......
"मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे शपथ घेते की.. ..."
ही शपथ काल तुम्ही एकटीने घेतली नाहीत, ही शपथ घेतली मुंडे साहेबांबद्दल श्रद्धा आणि तुमच्यावर विश्वास असणाऱ्या महाराष्टाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांनी. वृध्द मायमाऊल्या, गरीब शेतकरी, चैतन्यपूर्ण युवा, भविष्याची आस धरणारी चिमुरडी बालक, त्या सर्वांनी ज्या वंचितांची वाणी आणि वाली बनण्याचा तुमचे केवळ विचारच नाहीत तर वर्तणूक पण आहे.
माँ काल तुमच्या रूपाने आम्हा सर्वांनाच जणू मंत्रीपदाची शपथ घेतल्याची भावना झाली. त्यामुळे अभिनंदन तुमच नाही अभिनंदन आमच आणि शुभेच्छा तुम्हाला. तुमच्या हातून पूर्वीपेक्षा व्यापक आणि अविरत जनसेवा घडो! आणि या प्रवासात ईश्वरकृपेने बाबांचे आशीर्वाद आणि सामान्यांच प्रेम व विश्वास सदैव तुमच्या सोबत राहोत!
Proud of you Maa
Pankaja Gopinath Munde
--------------------------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा