यंदाच्या मकरसंक्रांतीला 19 वर्षांनंतर एक दुर्मिळ योग !

 जाणून घ्या: यंदाच्या मकरसंक्रांतीला 19 वर्षांनंतर एक दुर्मिळ भौम पुष्य योग : पूजा ,शुभ मुहूर्त  व पुजा संक्रमण काळ

     संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव मानला जातो. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकरसंक्रांत असं म्हटलं जातं. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायण ही म्हणतात. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे. या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिक दृष्ट्यादेखील महत्त्व आहे.संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन, अशा 12 संक्रांत असतात. मात्र आपण एकच संक्रांत मानतो. संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य अनेक पटीने पुन्हा परत करत असतो असे मानतात. 

मकर संक्रांत तिथी

वैदिक पंचांगानुसार मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी सूर्य देव सकाळी 9.03 वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीची पूजा, स्नान, दान इत्यादी शुभ कार्ये शुभ काळात करण्यात येतात. 14 जानेवारी रोजी पुण्यकाल सकाळी 09:03 ते संध्याकाळी 05:46 पर्यंत असणार आहे. तर या दिवशी, महा पुण्यकाळ सकाळी 09:03 ते 10:48 पर्यंत असणार आहे.

मकर संक्रांती 2025
सुगड पूजा शुभ मुहूर्त 

19 वर्षांनंतर एक दुर्मिळ भौम पुष्य योग मकर संक्रांतीच्या दिवशी तयार होत आहे. मंगळवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येते तेव्हा भौम पुष्य नक्षत्र येते. मंगळाला पृथ्वी असेही म्हणतात. मकर संक्रांतीच्या निमित्ताने सकाळी 10.17 पासून भौम पुष्य योग दिवसभर राहील. अशा स्थिती तुम्ही 10.17 पासून दिवसभर सुगड पूजा करु शकणार आहात. 

पूजा साहित्य

1. काळे तीळ, गूळ किंवा काळ्या तिळाचे लाडू
2. तांदूळ, डाळी, भाज्या किंवा खिचडी, तीळ, तिळाचे लाडू, गूळ इत्यादी दान करा.
3. गाईचे तूप, सप्तध्याय म्हणजे 7 प्रकारचे धान्य किंवा गहू
4. तांब्याचे भांडे, लाल चंदन, लाल वस्त्र, लाल फुले आणि फळे
5. एक दिवा, धूप, कापूर, नैवेद्य, सुगंध इ.
6. सूर्य चालीसा, सूर्य ग्रंथ आरती आणि आदित्य हृदय स्तोत्र

मकरसंक्रांती: १४ जानेवारी २०२५

संक्रमण पुण्यकाल: सकाळी ०८ वाजून ५४ मिनिटे ते सायंकाळी ०४ वाजून ५४ मिनिटे.

अभिजित मुहूर्त: दुपारी १२ वाजून ०९ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ५१ मिनिटे.

विजय मुहूर्त: दुपारी ०२ वाजून १५ मिनिटे ते दुपारी ०२ वाजून ५७ मिनिटे.

गोधूली मुहूर्त: सायंकाळी ०५ वाजून ४३ मिनिटे ते ०६ वाजून १० मिनिटे.

अमृत ​​काल: सकाळी ०७ वाजून ५५ मिनिटे ते ९ वाजून २९ मिनिटे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !