इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 उस्मानाबाद बँकेच्या परळी वैजनाथ शाखेला 25 वर्षे पुर्ण: वर्धापन दिनानिमित्त स्नेहमिलन उत्साहात 

परळी वैजनाथ....उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या परळी वैजनाथ शाखेला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने परळी शाखेत पूजा व अल्पोपहार कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अनेक ग्राहक व हितचिंतकांनी बँकेत भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्रात नावाजलेल्या उस्मानाबाद जनता सरकारी बँकेच्या परळी शाखेला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शनिवार, दि 25 जानेवारी रोजी बँकेत पूजा व अल्पोपहार कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी अनेक ग्राहक व हितचिंतकांनी बँकेस भेट देत शुभेच्छा दिल्या. बँकेचे व्यवस्थापक प्रशांत गरड यांनी, परळीच्या बँकिंग क्षेत्रात ग्राहकांना विविध सुविधा देत अल्पावधीतच उस्मानाबाद बँक विश्वासू बँक म्हणून ग्राहकांच्या आवडीची बँक झाली आहे. सर्वच ग्राहक बँक देत असलेल्या सेवेबाबत समाधानी आहेत. यापुढेही बँकेकडून ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न राहील असे यावेळी बोलताना सांगितले.

या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने उस्मानाबाद बँकेचे परळी शाखा व्यवस्थापक प्रशांत गरड यांना पुष्पगुच्छ देऊन भाजपाचे अश्विन मोगरकर, सा. संघर्षनेताचे संपादक मोहन व्हावळे,  संपादक रामप्रसाद गरड, राजेश साबणे, नवराष्ट्र चे पत्रकार महादेव शिंदे, दत्तात्रय जोगदंड पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी बँकेचे विधी सल्लागार ॲड. संजय फुने बँकेचे कर्मचारी अमर शिंदे, माधव शिंदे, विलास कांबळे, हरी गुलगुले, संतोष राजे, एम बी मोटे, बाळूमामा उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!