महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, उल्लेखनिय काम करणाऱ्या 3 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात देखील विविध क्षेत्रात मोठं काम करणाऱ्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नागपूरचे प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार, तसेच प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चैत्राम पवार यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र सरकारनं आज पद्म पुसरस्करांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 3 जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. देशाच्या इतरही भागातील वेगवेगळ्या क्षेत्रातअनोखे काम करणाऱ्यांच्या पद्म पुरस्कारासाठी निवड केली आहे. महाराष्ट्रातून होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. चैत्राम पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा