काळजाला हेलावून टाकणारी दुर्दैवी घटना: मुलाच्या आत्महत्येनंतर पित्यानेही त्याच दोरीने घेतला गळफास
नांदेड जिल्ह्य़ातील बिलोली तालुक्यातील मिनकी येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पैलवार (वय 43) व त्यांचा मुलगा ओमकार (वय 16) यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.९) सकाळी उजेडात आली.
राजेंद्र पैलवार यांना पत्नी, तीन मुले आहेत. पहिला मुलगा बारावी पास असून तो शेती पाहतो. दुसरा मुलगा अकरावीत तर तिसरा ओमकार हा दहावीचे शिक्षण घेतो. दोघेही लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शंकर माध्यमिक विद्यालय आश्रम शाळेत शिकतात. पैलवार यांना २ एकर शेती असून, त्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे साडे चार लाखांचे कर्ज आहे. याशिवाय काही खासगी कर्ज होते. कर्ज व सततची नापिकी तसेच मुलांच्या शिक्षणामुळे घरात आर्थिक ताण पडत असे. त्यातच संक्रात सणानिमित्त दोन दिवसांपूर्वी उदगीर येथे शिकायला असलेली दोन्ही मुले गावाकडे आली होती.
ओमकार हा बुधवारी दुपारी वडिलांकडे नवीन कपडे, शालेय साहित्य, नवीन मोबाईल घेण्यासाठी पैसे मागत होता. परंतु, वडिलांनी काही दिवस थांब, सध्या पैसे नाहीत, असे सांगितल्याने तो नाराज झाला. त्या नैराश्यात येऊन रात्रीच्या वेळेस शेतातील झाडास गळफास घेत आत्महत्या केली. मुलगा घरी नसल्याचे पाहून वडिलांनी दुसर्या दिवशी सकाळी त्याची शोधाशोध करीत शेताकडे गेला असता शेतातील लिंबाच्या झाडाला मुलगा गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. मुलाने गळफास घेतलेले पाहून त्यांनी आत्महत्या केलेल्या मुलांचा दोरखंड सोडून त्यानेच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा