व्हाईस चेअरमन रमेशराव कराड यांच्या हस्ते झालं वैद्यनाथ बँकेचे ध्वजारोहन


परळी / प्रतिनिधी - 76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्ता वैद्यनाथ बँकेचे ध्वजारोहण संपन्न झाले.सहकार क्षेत्रात नावाजलेली व संपुर्ण महाराष्ट्रात शाखा असलेली अग्रगण्य बँक म्हणून मागील 59 वर्षांपासून अविरतपणे ग्राहक सेवा देणारी बँक दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप.बँक लि. परळी-वै. च्या मुख्य कार्यालयात बँकेचे व्हाईस चेअरमन रमेशराव कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. 


वैद्यनाथ बँक स्व. गोपीनाथराव मुंडे  यांच्या प्रेरणेने व महाराष्ट्र राज्याच्या पशु संवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे आणि मा.खा.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरंतर प्रगती करत आहे.  76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बँकेच्या परळी-वै.येथील मुख्य कार्यालयात व्हाईस चेअरमन  रमेशराव कराड यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी बँकेचे संचालक माजी चेअरमन विकासराव डूबे,  नारायण सातपुते,  प्रकाश जोशी, महेश्वर निर्मळे,अनिल तांदळे, . प्रा.दासू वाघमारे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद खर्चे  यांचेसह बँक कर्मचारी,पिग्मी एजंट उपस्थित होते.

******

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !