अंबाजोगाई तालुक्यात खंडणीचा प्रकार समोर; महिला सरपंचाला मागितली एक लाखाची खंडणी


 अंबाजोगाई, प्रतिनिधी...

        केज तालुक्यातील मस्साजोग येथे आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या प्रकरणाने राज्यभर चर्चा होत असतानाच आता अंबाजोगाई तालुक्यातही एका महिला सरपंचालाच खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा ग्रामपंचायतच्या महिला सरपंचाला गावातीलच उपसरपंच व अन्य दोन ग्रामपंचायत सदस्यांनी एक लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, ममदापूर पाटोदा ता. अंबाजोगाई येथील महिला सरपंच मंगल राम मामडगे यांना तिघाजणांनी एक लाख रुपये खंडणी मागितल्याची फिर्याद दिल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या महिला सरपंचांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ममदापूर पाटोदा या गावात विकास कामाकरिता निधी आल्यानंतर वेळोवेळी हेच लोक अडथळे आणतात. त्याचबरोबर शासकीय कार्यालयात जाऊन खोट्या तक्रारी देतात. आपल्यावर मानसिक दहशत टाकतात. असे प्रकार वारंवार होत होते. दि. 16 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद शाळा ममदापूर येथील दुरुस्तीची कामे सुरू होती. ते पाहण्याकरिता जात असताना वसंत सोपान शिंदे, अनिल लालासाहेब देशमुख व ज्ञानोबा श्रीमंतराव देशमुख हे शाळेजवळ आले. एकमेकांना बोलत असताना गावातील साक्षीदार दोन व्यक्ती समोर त्यांनी सरपंचांना शाळा दुरुस्तीच्या कामासाठी आलेल्या चार लाख रुपयांपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या अशी मागणी केली. एक लाख रुपये नाही दिले तर तुम्हाला गावातील कोणतेच काम करू देणार नाही. तसेच तुमच्यावर अर्ज देऊन आधीच्या माजी महिला सरपंचांनी  आम्हाला पैसे न दिल्यामुळे त्यांना जेलमध्ये जावे लागले तशीच तुमची अवस्था करून टाकू अशी धमकी दिली. याबाबत  त्याच वेळी या लोकांविरुद्ध ऑनलाइन तक्रार केली होती. त्यामुळे आज दि.१५ जाने.२०२५ रोजी प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात येऊन आपण तक्रार नोंदवत असल्याचे या महिला सरपंचांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार