धारासुर येथील भागवतकथा ज्ञानयज्ञात कु. स्नेहल रमेशराव मुंडीकचा प्रासादिक गौरव!

प्रेम भक्ती साधना केंद्राच्या वतीनेही संतपुजन व नवनिर्वाचितांचा सत्कार

गंगाखेड, प्रतिनिधी....
     तालुक्यातील धारासुर येथे भागवतमर्मज्ञ ह भ प बाळू महाराज उखळीकर यांच्या सुमधुर वाणीतून  श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहात धारासुर येथील मूळ रहिवासी व हल्ली मुक्काम परळी येथील प्रसिद्ध सराफ व्यापारी रमेश मुंडलिक यांची सुकन्या स्नेहल मुंडिक ने अभियांत्रिकी परीक्षेत मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल तिचा महाराजांच्या हस्ते प्रासादिक गौरव करण्यात आला.  त्याचबरोबर परळी वैजनाथ येथील प्रेमभक्ती साधना केंद्राच्या वतीनेही भागवतमर्मज्ञ ह भ प बाळू महाराज उखळीकर यांचे संत पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवर व गावचे नवनिर्वाचित पोलीस पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
         धारासुर येथेअंखड हरिनाम सप्ताह  सोहळा  सुरू असुन भागवताचार्य  ह. भ. प. बाळू महाराज उखळीकर  यांच्या  सुमधुर वाणीतून  भागवत कथा श्रवण करताना  पंचक्रोशीतील  भाविक भक्त मंत्रमुग्ध होवून जात आहेत.भक्ती साधना केंद्राच्या वतीने मुंडीक सहपरिवार (धारासुरकर ) यांच्या हस्ते ह. भ. प.बाळू महाराज यांचा शाल श्रीफळ पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. तसेच धारासुर येथील नवंनिर्वाचित  पोलीस पाटील श्री  बाळू भाऊ रनबावरे यांचाही प्रेम भक्ती साधना केंद्राच्या वतीने सन्मानपूर्वक. शाल श्रीफळ व प्रभू वैद्यनाथांची प्रतिमा/ भेट  देऊन  सत्कार करण्यात आला.
   यावेळी पुणे येथील राजुरी सह्याद्री व्हले अभियात्रिकी या  शाखेतून इलेक्ट्रिकल अँड टेली कम्युनिकेशन या विषयात. 9,58 / 98% टक्के गुण मिळवल्याबद्दल    कु. स्नेहल रमेशराव मुंडीक ( धारासूरकर  )  यांचा  भागवताचार्य ह. भ. प.  बाळू महाराज यांच्या हस्ते सौ. जाधव ताई यांच्या हस्ते प्रासादिक गौरव करण्यात आला. यावेळी धारासुर येथील समस्त गावकरी मंडळ , सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील  मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी परभणी भा. ज. पा. माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांचा  भागवत कथा प्रवक्ते ह. भ. प. बाळू  महाराज  यांच्या हस्ते समस्त गावकरी, मित्र मंडळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी  ह.भ. प.तुकाराम महाराज , श्री. नामदेव भाऊ जाधव, श्री बाळासाहेब नेमाने (माजी सभापती) आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार