धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया....

अजितदादा बीडचे पालकमंत्री: धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया काय?

परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

    राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री आज जाहीर करण्यात आले यामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राहिलेल्या धनंजय मुंडे यांनी ट्विट करून अजितदादा पवार यांचे अभिनंदन केले आहे. अजित दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला मोठी गती मिळेल असा आपल्याला विश्वास असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

 धनंजय मुंडे यांचे नेमके ट्विट काय आहे

   बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री  ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे.


बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो.


सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री व  उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार