निवडणुकीनंतर प्रथमच गडावर !

 धनंजय मुंडे श्री क्षेत्र भगवानगडावर नतमस्तक

निवडणुकीनंतर प्रथमच गडावर, येथे आल्याने लढायची शक्ती आणि कामाची ऊर्जा मिळते - धनंजय मुंडे


संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन, महंत डॉ. नामदेव शास्त्री यांचे घेतले आशीर्वाद


गड परिसरातील भाविकांनी मुंडेंचे केले स्वागत


महंत डॉ. नामदेव शास्त्री व मुंडेंची उशिरापर्यंत चर्चा


पाथर्डी/भगवानगड (प्रतिनिधी) - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे हे आज बीड येथील जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर थेट श्री क्षेत्र भगवानगड येथे मुक्कामी गेले आहेत. धनंजय मुंडे यांनी संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन वंदन केले. गडाचे द्वितीय महंत ह.भ.प. भिमसिंह महाराज यांच्याही समाधीस्थळी श्री मुंडे नतमस्तक झाले. 


विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच गडावर आलो असून, संत भगवानबाबा यांचा मी एक निस्सीम भक्त आहे. या स्थळी नतमस्तक होऊन मला लढायची शक्ती आणि लोकांची कामे करण्यासाठी ऊर्जा मिळते, आज या ठिकाणी मुक्कामी राहणार असून, गडाचा प्रसाद ही घेणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.


धनंजय मुंडे यांनी यावेळी गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांचे दर्शन व आशीर्वाद घेऊन गडावरील संत ज्ञानेश्वर मंदिर, शिक्षण संस्था, वारकरी शिक्षण संस्था आदींची महंतांच्या सोबतीने पाहणी केली. 


गडाच्या परिसरातील भाविकांनी यावेळी धनंजय मुंडे यांचे स्वागत केले. यावेळी परिसरातील असंख्य महिला व पुरुष भाविक उपस्थित होते.


दरम्यान भगवान गडाचे महंत डॉ.  नामदेव शास्त्री व धनंजय मुंडे यांची उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. श्री क्षेत्र भगवानगड या तीर्थक्षेत्राचे राज्याच्या अध्यात्मिक, सामाजिक त्याचबरोबर राजकीय क्षेत्रात देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी देखील श्री क्षेत्र भगवानगड येथे दर्शन घेऊन गडाने सुरू केलेल्या पहिल्या शिक्षण संस्थेची पायाभरणी वै. संत भगवानबाबा यांच्या उपस्थितीत त्यांच्या स्वहस्ते केली होती. 


धनंजय मुंडे यांचे लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या काळापासून गडावर नेहमी येणे जाने होते. तसेच धनंजय यांच्या मातोश्रींना देखील भगवानगडाची पारंपरिक सेवा घडलेली आहे. गडाच्या सान्निध्यात व आशीर्वादाने धनंजय मुंडे यांचा राजकीय आलेख कायम चढता राहिलेला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !