दिल्लीत गाजवणार बीड जिल्ह्याचे नाव......!

 दामिनीताई  आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे, नाही फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख यांचे मंत्री धनंजय मुंडे यांनी केले कौतुक व अभिनंदन

बीड जिल्ह्याची लेक प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणानंतर ध्वजावर करणार हवाई पुष्पवृष्टी 

मुंबई (प्रतिनिधी) - बीड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून प्रजासत्ताक दिनाच्या राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावरील मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात बीड जिल्ह्याची लेक, फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख ध्वजारोहणानंतर ध्वजावर हवाई पुष्पवृष्टी करणार आहे. याबद्दल मंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर दामिनी देशमुख यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.


बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील देवडी गावची दामिनी दिलीप देशमुख वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून कार्यरत असून राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्यात ‘परेड कमांडर’ म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे, हा सोहळा पाहताना बीड जिल्हा वासीय म्हणून आमच्या सर्वांच्या हृदयात आनंद आणि अभिमान दाटून येईल एवढं नक्की! असे धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे.


तसेच दामिनी ताई आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे, तुझे खूप खूप अभिनंदन असेही आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार