चार दिवसांपासून गायब-'जेली' चा विरह साहवेना : श्वानपालक चिंतातूर
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
परळी शहरातील एका श्वानप्रेमींने पाळलेली डॉबरमेन जातीची कुत्री चार दिवसांपासून गायब झाल्याने हे श्वानपालक चिंतातूर झाले आहेत.चार दिवसांपासून शोधमोहीम सुरु आहे मात्र अद्याप या श्वानाचा शोध लागलेला नाही.त्यामुळे कोणास आढळलेला असेल अथवा कोणी बांधून ठेवले असेल तर सुपूर्द करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
सध्या अनेक कुटुंबातील सदस्य असलेले श्वान नेहमीच चर्चेत असतात. मोठमोठ्या नेत्यांपासून ते सर्व सामान्यांपर्यंत श्वान प्रेम हल्ली वाढीस लागलेले दिसते. आपल्या लाडक्या श्वानांसोबत मज्जा करतानाचे अनेकांचे फोटो व्हायरल झालेले नेहमीच बघतो.कुटुंबातील एखाद्या सदस्यासारखी अनेक जण आपल्या पाळीव कुत्र्यांची काळजी घेतात. विशेष म्हणजे ते त्यांचे वाढदिवसही साजरे करतात. अशाच प्रकारचे श्वानप्रेमी असलेल्या परळीतील संदिप चौडे यांची पाळीव 'जेली' नावाची श्वान चार दिवसांपासून गायब झाल्याने ते चिंतातूर झाले आहेत.कोणास सापडल्यास संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
परळी शहरातील संदिप चौडे यांचा पाळीव श्वान (डॉग) हा रविवार दि. १२ जानेवारी रोजी हनुमान नगर ते चादापुर रोड भागात हरवला आहे. तरी कोणास सापडल्यास मो. ९७६७०४६५५५ या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. आजतागायत हा डॉबरमेन जातीचा व जेली नावाचा श्वान (डॉग) सापडला नाही. जर कोणी घरात बांधून ठेवली असेल तर संपर्क करून आणनू द्यावी किंवा कळवावे अन्यथा आपण शोध घेऊन एक दोन दिवसात पोलीसात रीतसर तक्रार करणार असल्याचे संदीप चौंडे यांनी म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा