उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळणार बूस्टर डोस

उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध विषयांवर बैठकीचे आयोजन


मंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीवरून बैठकीचे आयोजन, सहकारमंत्री यांच्यासह मंत्री पंकजाताई मुंडे राहणार उपस्थित


मुंबई (दि. २८) - मागील काही वर्षांपासून अडचणीत असलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला आर्थिक मदत करून गतवैभव प्राप्त करून देण्याच्या अनुषंगाने बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध विषयांवर बुधवारी (ता.२९) रोजी सकाळी ११.१५ वा. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार विभागाने बैठकीचे आयोजन केले आहे. 


बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला आर्थिक मदत करून गतवैभव प्राप्त करून देणे त्याचबरोबर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला कर्ज पुरवठा करणे यांसह विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होऊन जिल्हा बँकेला बूस्टर डोस मिळणे अपेक्षित आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीवरून या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.


या बैठकीस सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांसह नियोजन व सहकार विभगाचे वरिष्ठ अधिकारी तसेच व्हिसी द्वारे बीड जिल्हाधिकारी आणि जिल्हा बँकेचे प्रशासकीय मंडळ उपस्थित राहणार आहेत.


मागील काही वर्षांपासून अडचणीत असलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला या बैठकीच्या माध्यमातून आर्थिक बूस्टर मिळण्याची अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे. दरम्यान बीड सोबतच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या देखील विविध विषयांवर याच बैठकीत चर्चा होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !