ज्योत्सना देवलिंग स्वामी यांचा उद्या सेवापूर्ती गौरव सोहळा
परळी/प्रतिनिधी
वडगाव दा.येथील जि.प.प्रा.शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती ज्योत्सना देवलिंग स्वामी मानुरकर यांचा उद्या रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सेवापूर्ती गौरव सोहळा श्रद्धा मंगल कार्यालय, पावर हाऊससमोर, परळी येथे दुपारी 11.30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार असून या कार्यक्रमास शिक्षण क्षेत्रातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
जि.प.प्रा.शाळा वडगाव येथील सहशिक्षिका श्रीमती ज्योत्सना देवलिंग स्वामी मानुरकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उद्या रविवारी आयोजित करण्यात आला आहे. श्रद्धा मंगल कार्यालय येथे दुपारी 11.30 वाजता हा गौरव सोहळा होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेचे बीड जिल्हाध्यक्ष श्री दत्ताप्पा गणपतअप्पा इटके राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून परळी पं.स.चे गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, परळी पं.स.चे गटशिक्षणाधिकारी एस.एम.कनाके, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती एच.यु.अन्सारी, श्री जी.एस.कराड, वाय.एस.पल्लेवाड, एम.एस.सय्यद, ए.एस.गव्हाणे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहेत.
या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहावे आवाहन श्री पारलिंग महादेव मानुरकर, श्री विलास महादेव मानुरकर, श्री रामलिंग पारलिंग मानुरकर, सौ.प्रांजल रामलिंग मानुरकर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा