विद्यार्थ्यांनी लुटला मनमुराद आनंद !!!

 मिलिंद माध्यमिक विद्यालयात आनंदनगरीमध्ये ३२ स्टॉल्सवर ४० हजारांच्या वर उलाढाल

 विद्यार्थ्यांनी लुटला मनमुराद आनंद


दि.२५ जानेवारी २०२५

(प्रतिनिधी): परळी वै. येथील नाथ शिक्षण संस्था संचलित मिलिंद माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी ३२ विविध पदार्थ विक्रीसाठी स्टॉल लावले.

शाळेच्या प्रांगणात भरवलेल्या आनंदनगरीत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात वेगवेगळी दुकाने मांडून व्यावहारिक कौशल्य दाखवले. विद्यार्थ्यांनी एकूण ३२ दुकाने थाटली होती, ज्यात चाळीस हजार रूपयांच्यावर  उलाढाल झाली.

या आनंदनगरीत विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनी मनमुराद आनंद लुटला.


 आनंदनगरीतील विविध खाद्य पदार्थांचा सर्वांनी माफक दरात आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात व्यवहारिक ज्ञान मिळावे, त्यांना खरेदी- विक्रीचा अनुभव यावा, व्यवहारिक ज्ञान विकसीत व्हावे या अनुषंगाने सदरील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.   

विद्यार्थी स्टॉल धारकांनी पाणीपुरी, भेळ, खिचडी, भजे, खिर,गुलाब जामुन, कोरडी भेळ, फ्रूट स्टॉल, वडापाव, पॅटीस, चायनीज अन्नपदार्थ, मोमोस, फ्लॉवर वडे, भेळ, मिसळ पाव, पावभाजी,थंड पेये इत्यादी विविध प्रकारचे खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. कार्यक्रमास पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. त्यांनीही आनंदनगरीचा आनंद मनसोक्त लुटला.


आजच्या या आनंद नगरीचे उद्घाटन शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक श्री.अमोल गायकवाड साहेब व श्री.कांबळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मिलिंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कदरकर सर, पर्यवेक्षक श्री. धायगुडे सर व शाळेतील सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


 आनंदनगरीचे उत्कृष्ट नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.नितीन व्हावळे सर व मिलिंद माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षिका यांनी केले. त्यात सौ.कोम्मावार मॅडम,पवार मॅडम, बीडवे मॅडम,प्रा.डी.बी.कर्हाळे मॅडम,प्रा.टी.बी.कांबळे मॅडम प्रा.एस.एम.गित्ते मॅडम,भोसले मॅडम आदींनी परीक्षनाचे कार्य केले. सर्वोत्कृष्ट पक्वान्न,सादरीकरण,व्यवहार कुशल मृदू भाषा, स्वच्छता व रास्त दर यांचे निकष लावून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांस मुख्याध्यापक श्री.कदरकर सर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

आपल्या पाल्यांचे व्यवहारज्ञान पाहण्यासाठी या कार्यक्रमास पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार