संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीसाठी सेवानिवृत्त न्यायाधिश एम.एल. ताहलीयानी समिती

 बीड –संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीसाठी सेवानिवृत्त न्यायाधिश एम.एल. ताहलीयानी समिती गठीत करण्यात आली आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणात एस आय टी, सीआयडी नंतर आता न्यायालयीन चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात या संदर्भात घोषणा केली होती.सेवानिवृत्त न्यायाधिश एम.एल. ताहलीयानी ही चौकशी करणार आहेत.

हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची एसआयटी चौकशीसोबतच न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती मात्र या संदर्भात कुठलेही आदेश निघाले नसल्याने विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत होते.अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी सेवानिवृत्त न्यायाधिश एम.एल. ताहलियानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चौकशी समितीचे मुख्यालय बीड येथे राहणार असून समितीला चौकशीसाठी कोणत्याही व्यक्तीला बोलावण्याचा तसेच कागदपत्रे जप्त करण्याचा, झाडाझडतीचा अधिकार राहणार आहे. सहा महिन्याच्या आत समितीकडून आपला अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे.

 सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी

परभणीमध्ये 10 डिसेंबर रोजी भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. त्यानंतर परभणीमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. त्याच केसमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय वकील तरुणाला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. पण कोठडीत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याने या प्रकरणात सरकारवर मोठी टीका झाली. पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीच्या धक्क्यामुळे सोमनाथचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टम अहवालात समोर आलं होतं. या प्रकरणाशी संबंधित पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता व्ही एल आचलिया यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. परभणीतील हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील घडलेल्या घटनांचा क्रम, त्याची कारणे आणि परिणाम याचा अभ्यास या समितीकडून करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार