बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा !

 लई मागचे बोलू नका, तुम्हाला जे म्हणायचे आहे, त्याची लेखी तक्रार करा !


अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं 

बीड: अजित पवार यांच्यासोबत उजव्या बाजूला दोन मंत्री म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे बसले होते. त्यांच्या बाजूला खासदार रजनी पाटील आणि बजरंग सोनवणे हे बसले होते. तर समोरच्या बाजूला सगळे आमदार म्हणजे सुरेश धस, त्यानंतर नमिता मुंदडा, त्यासोबतच विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंके समोर बसल्याचे  दिसत होते. अजित पवार यांनी बैठकीच्या सुरुवातीला पंतप्रधान आवास योजनेची माहिती घेतली. या बैठकीत अजित पवार यांनी जिल्ह्यातील चुकीच्या कामाची चौकशी होणार, असे सांगितले. तसेच नियोजन आराखड्याबाहेरची आतिरिक्त कामांना आतिरिक्त कामे कशी काय मंजूर केली, असा सवाल अजितदादांनी अधिकाऱ्यांना विचारला. यापुढे जिल्ह्यातील विकासकामात राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

      सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) बैठकीत गुरुवारी अपेक्षेप्रमाणे हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस  यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड  यांच्याविरुद्ध रान उठवले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही सुरेश धस यांनी पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यासमोर त्याच आवेशात बीडमधील विकासकामांच्या नावाखाली पैसे उचलण्यात आल्याचा मुद्दा मांडला. मात्र, विरोधकांना खमक्या भाषेत उत्तर देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवार यांनी सुरेश धस यांचा 'परफॉर्मन्स' फार बहरु दिला नाही. "तुम्ही लई मागचे बोलू नका, तुम्हाला जे म्हणायचे आहे, त्याची लेखी तक्रार करा, असे सांगत अजित पवार यांनी सुरेश धस यांचे बोलणे कापले आणि त्यांना फार वाव दिला नाही. बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रसारमाध्यमांना प्रवेश नव्हता. मात्र, ही बैठक संपल्यानंतर बाहेर पडलेल्या आमदार आणि लोकप्रतिनिधींमध्ये अजित पवार आणि सुरेश धस यांच्यात झालेल्या या खडाजंगीची खमंग चर्चा रंगली होती. 

अधिकाऱ्यांनी कुणाच्याही दबावात काम करण्याची गरज नाही. पोलिसांच्या कामातही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. बीड जिल्ह्यातील कामे दर्जेदार झाले पाहिजेत. जर तुम्हाला कोणतीही अडचण आली तर तुम्ही थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क करा, असे अजित पवार यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सांगितले.

        ही बैठक संपल्यानंतर सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घडलेल्या प्रकारविषयी सारवासारव करण्याचा प्रयत्न. बैठकीत बाचाबाची झाली, पण तो प्रसारमाध्यमांनी चर्चा करण्याइतका मोठा विषय नसल्याचे सुरेश धस यांनी सांगितले. डीपीडीसीच्या आजच्या बैठकीत रिअॅप्रोपिएशनबाबत कुठलाही निर्णय झाला नाही. आष्टीत जनावारांच्या बाबतीत झेरॉक्स आणि मशीन पोट तपासायचं मशीन त्यासाठी 50 लाख देण्याचा निर्णय झाला. बीडमधील विविध बोगस कामांसाठी तब्बल 73 कोटी रुपये उचलण्यात आले. बोगस कामांसाठी पैसे उचलल्याचा मुद्दा मी उपस्थित केला. तेव्हा अजितदादांनी लेखी पत्र द्या, असे सांगितले. मी त्यानुसार लेखी पत्र तयार केले आहे. बैठकीतील बाचाबाचीचा विषय किरकोळ आहे. मी हे बोगस पैसे उचलल्यासंदर्भातचे पुरावे आणि कागदपत्रे पेनड्राईव्हच्या माध्यमातून अजित पवार यांच्या पीएला दिली आहेत, असेही सुरेश धस यांनी सांगितले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार