केज मधून गावठी कट्टा व काडतुस जप्त : दोन आरोपी केले जेरबंद
केज (दि.६) :- जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या सूचने नुसार जिल्ह्यात अवैध धंदे करणारांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. तसेच अवैध शस्त्र बाळगणारे रडारवर आहेत. त्याच अनुषंगाने अंबाजोगाई नंतर केज तालुक्यातही गावठी कट्टा बाळगणाऱ्यास जेरबंद केले आहे.
दि. ६ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार जफर पठाण यांना गुप्त बातमी मिळाली की, केज तालुक्यातील लव्हुरी येथील सोमनाथ राजाभाऊ चाळक याचेकडे एक गावठी कट्टा असून तो लव्हुरी येथे जिल्हा परिषद शाळे जवळ थांबला आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळताच सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांना दिली. त्या संदर्भात पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस हवालदार जफर पठाण यांना दिले. आदेश मिळताच जफर पठाण यांनी सोबत.स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील सहकाऱ्यांनी घेवुन लव्हुरी येथे सापळा लावला. या सापळ्यात त्यांनी लव्हुरी येथुन सोमनाथ राजाभाऊ चाळक यास ताब्यात घेतले. ताब्यात घेताच पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलीसांनी गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे ताब्यात घेतले.
आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा गावठी कट्टा केज तालुक्यातील सावंतवाडी येथील विकास सुभाष सावंत याचे कडुन घेतल्याचे सांगितले. त्या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुभाष सावंतचा शोध घेवुन त्यास सावंतवाडी येथुन ताब्यात घेतले आहे.आरोपीकडुन जप्त केलेला एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे ज्याची किंमत ४२ हजार रु आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलेले सोमनाथ राजाभाऊ चाळक आणि विकास सुभाष सावंत याला केज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. केज पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध शस्त्र प्रतिबंधक अधिनियम नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा