वैद्यनाथ कॉलेजमध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये भारत निवडणूक आयोगाने दि. 25 जानेवारी 2025 हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. नव्याने नोंदणी झालेल्या 18 वर्षाच्या वयोगटातील मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभाग करून घेणे. लोकशाही प्रक्रियेतील मतदान जनजागृती हा महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. या दिनाचे औचित्य साधून मतदारांसाठीची प्रतिज्ञा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. ए आर चव्हाण यांनी सर्व प्राध्यापकांसमवेत दिली. हा कार्यक्रम परळी तहसीलमार्फत घेण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या,डॉ. ए आर चव्हाण, प्राध्यापक प्रतिनिधी डॉ.पी एल कराड, उपप्राचार्य, डॉ.व्ही बी गायकवाड, प्रा. डी के आंधळे, प्रा. हरीश मुंडे, समन्वयक प्रा. उत्तम कांदे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा