भाजपच्या कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड



भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्ड यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतचे पत्रक काढले आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पूर्वीच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद सांभाळलेल्या रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे थोडे नाराज झालेल्या चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र त्यांच्यावर कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी अजूनही चंद्रशेखर बावनकुळे आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्षपद अद्याप सोडलेले नाही. 

रवींद्र चव्हाण कोण आहेत? 

रविंद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते 2009 पासून सलग 4 वेळा त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निडवणुकीत त्यांनी 50 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवलं होतं. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रि‍पदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

   रविंद्र चव्हाण यांच्याकडे भाजपने 2002 साली कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. 2005 साली त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणू्न प्रवेश मिळवला होता. 2007 मध्ये ते स्थायी समिती सभापती झाले होते. 2009 साली कल्याण विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी वर्चस्व मिळवलं आणि मोठा विजय देखील मिळवला. त्यानंतर 2016 साली त्यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदारकी मिळवण्याची  हॅटट्रीक पूर्ण केली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार