मकरसंक्रांत: बाजारपेठेत पोलीस गस्त वाढवा-वैद्यनाथ भक्ती मंडळ
परळी प्रतिनिधी
अवघ्या काही दिवसा वरतीच आलेला मकर संक्रात सणानिमित्त माता भगिनीची खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असते त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने पेट्रोलिंग वाढवावी अशी मागणी निवेदनाद्वारे धर्मवीर सामाजिक युवा प्रतिष्ठान संचलित वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
दिनांक 10 जानेवारी रोजी धर्मवीर सामाजिक युवा प्रतिष्ठान संचलित वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या पदाधिकारी यांनी पोलीस निरीक्षक परळी वैजनाथ शहर पोलीस स्टेशन यांची भेट घेऊन काही दिवसांवर येऊ घातलेल्या मकरसंक्राती निमित्त मोंढा मार्केट या भागामध्ये माता-भगिनी खरेदी करण्यासाठी येत असतात या काळात लक्ष्मीबाई टावर चौक आणि कृषी उत्पन्न बाजार समिती या भागात बॅरिगेटिंग करून पोलीस पेट्रोलिंग वाढवण्यात यावी जेणेकरून याआधी याच भागामध्ये छोट्याशा कारणावरून धार्मिक वाद निर्माण झाला होता त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने लक्ष देण्यासाठी भक्ती मंडळाचे प्रा .अतुल दुबे, किशोर गित्ते, ऋषिकेश नागापुरे, नामदेव गित्ते,दीपक जोशी,प्रशांत रामदासी, सुमितआप्पा उदगीरकर,रामचंद्र जाधव,अभिजीत गुट्टे यांनी निवेदना द्वारे मागणी केली आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा