संगीतसूर्य केशवराव भोसले कला-क्रीडा आणि सांस्कृतिक परिषदेच्या राष्ट्रीय समन्वयक पदी डॉ. वैजनाथ राठोड
(छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी):-छत्रपती संभाजीनगर येथील स्टेपिंग स्टोन इंग्लिश स्कुलचे नृत्य शिक्षक व प्रसिद्ध रंगकर्मी डॉ. वैजनाथ राठोड यांची मराठा सेवा संघ प्रणित संगीतसूर्य केशवराव भोसले कला-क्रीडा आणि सांस्कृतिक परिषदेच्या राष्ट्रीय समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार तसेच संगीतसूर्य केशवराव भोसले कला-क्रीडा आणि सांस्कृतिक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतीश पावडे यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांना कार्यभार सुपूर्द केला आहे. डॉ. वैजनाथ राठोड यांनी सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. नृत्य-नाट्य कलाविष्कारात पारंगत असलेले डॉ. वैजनाथ राठोड यांनी अनेक विद्यार्थी घडवून कला क्षेत्रात सक्षमपणे उभे केले आहेत. आजही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य ते करीत आहे. नाटक आणि बंजारा संस्कृतीचा अनुबंध या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे त्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे.
डॉ. वैजनाथ राठोड यांच्या मराठा सेवा संघ प्रणित संगीतसूर्य केशवराव भोसले कला-क्रीडा आणि सांस्कृतिक परिषदेच्या राष्ट्रीय समन्वयक पदी नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा