सहभाग घ्या - पर्यावरण संवर्धनात योगदान द्या
पं.दीनदयाल नागरी सहकारी बँक म.अंबाजोगाई च्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ई-कचरा संकलन अभियान
परळी वैजनाथ, प्रतिनिधी..
पं. दीनदयाल नागरी सहकारी बँक म.अंबाजोगाई च्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ई-कचरा संकलन अभियान राबविण्यात येणार आहे.नागरिकांनी या अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या घरातील ई कचरा आमच्या संकलन केंद्रावर जमा करून पर्यावरण संवर्धनासाठी आपला अमूल्य सहभाग आपण नोंदवावा ही विनंती.
आपण काय देऊ शकता...
बंद पडलेले संगणक,लँपटाँप,
सीडी
कँसेटस
मोबाईल
चार्जर
वायर
टेप रेकाँर्डर
स्पीकर, केबल
ओव्हन
फुड प्रोसेसर, मिक्सर
वाँशिंग मशिन
प्रिंटर
स्कॅनर
E-Yantran -ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान
तारीख- २६ जानेवारी २०२५, वेळ- सकाळी १०:०० ते दुपारी १:००
ई - यंत्रण आपल्या शहरात होत आहे, यात पर्यावरण रक्षणासाठी शहरांमधील नागरिकांना आवाहन आहे की, जास्तीत जास्त संख्येनी ई-कचरा नजीकच्या संकलन केंद्रांवर आणून द्यावा आणि सुयोग्य कचरा व्यवस्थापनाला चालना देत पर्यावरण संवर्धनात आपला वाटा उचलावा.
आपल्या घरातील व परिसरातील ई कचरा आपण आपल्या जवळील दीनदयाळ बँक शाखेत आणून द्यावा असे आवाहन दीनदयाल नागरी सहकारी बँक मर्यादित अंबाजोगाई यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा