विशेष बातमी / अमोल जोशी
श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थान येवती येथे वार्षिक संजीवन समाधिकाल महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताहास भाविकांची गर्दी
विशेष बातमी / अमोल जोशी
मुखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र येवती (लघु आळंदी) येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थांनच्यावतीने वार्षिक संजीवन समाधिकाल महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन नुकतेच करण्यात आले आहे. या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वार्षिक संजीवनी समाधीकाल महोत्सवास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सद्गुरु नराशाम महाराज मठात भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली आहे.
मुखेड तालुक्यातील श्री क्षेत्र येवती येथे सद्गुरु नराशाम महाराज जागृत मठ संस्थान आहे या मठ संस्थानात प्रतिवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. श्रीक्षेत्र येवती येथील मठात आयोजित सप्ताह भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.मठ संस्थांनच्या वतीने वार्षिक संजीवनी समाधी काल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उत्सवात नियमित कार्यक्रम पुढीलप्रमाणे झाले आहेत.
या सप्ताहात दररोज समाधी रुद्र अभिषेक, नामजप, अनुष्ठान, गुरु चरित्र पारायण, नराशाम स्तोत्र, गुरु महिमा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, हरिकीर्तन,आदी कार्यक्रम झाले आहेत. तर पहाटे ४ ते ६ काकडा, सकाळी ६ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण, नराशाम स्तोत्र, गुरु महिमा, सकाळी १० ते १२ गाथा भजन, सायं. ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरीकीर्तन झाले आहे. या
कार्यक्रमात १४ जानेवारी रोजी ह.भ.प. धोंडिबा महाराज मोकासदरेकर, १५ जानेवारी ह.भ.प. दत्ता महाराज शिरसाट बार्शीकर, १६ जानेवारी ह.भ.प. कृष्णा महाराज राजूरकर, १७ जानेवारी ह.भ.प. आकाश महाराज आळंदीकर, १८ जानेवारी ह.भ.प. वैभव महाराज आळंदीकर, १९ जानेवारी ह.भ.प. पांडुरंग महाराज कोकाटे आंबेजोगाई, २० जानेवारी भागवताचार्य ह.भ.प. सुनील महाराज आष्टीकर (सेलू), २१ जानेवारी भागवताचार्य ह.भ.प. सुनील महाराज आष्टीकर (सेलू)
यांचे काल्याचे कीर्तन झाले आहे.
दि.१९ जानेवारी २०२५ रोजी राहेर, हिप्परगाव जा, खतगाव, चिखली, हळदा, वसूर, हसनाळ, डोंगरगाव, कुंचेली बावलगाव, नायगाव, पायी दिंडीचे येवती ( लघु आळंदी) येथे आगमन झाले आहे.
दि.२० जानेवारी२०२५ रोजी सोमवारी श्री ज्ञानेश्वरी सांगता, सकाळी १० ते १२ गाथापूजा, दुपारी २ वाजता संजीवन समाधी महाअभिषेक, महाआरती व महाप्रसाद (भंडारा). महाप्रसादाचे आयोजन नायगावचे आमदार श्री राजेश संभाजीराव पवार, माजी जि.प. सदस्या सौ.पुनमताई राजेश पवार यांच्यावतीने करण्यात आले आहे. दि 21 जानेवारी 2025 रोज मंगळवारी गुरुमंत्र गुरुउपदेशाचा कार्यक्रम सकाळी १० ते ०२ वेळा मध्ये झाला आहे.
तसेच दि.२८मे ते दि.०८ जून २०२५या कालावधीत श्रीक्षेत्र रामेश्वर धाम यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वार्षिक संजीवनी समाधी काल महोत्सवातील विविध धार्मिक कार्यक्रमात भाविकांनी सहभाग घेतला आहे. नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, सौ.पुनमताई राजेश पवार माजी जिल्हा परिषद नांदेड यांनी सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थानास भेट देऊन संजीवन समाज दर्शन व सद्गुरु आशीर्वाद घेतला .वार्षिक संजीवनी समाधीकाल महोत्सवास मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी चोख बंदोबस्त दिला आहे. मठाधिपती सद्गुरु नराशाम महाराज यांच्या आशीर्वादानुसार पायी दिंडीचे राहण्याची व इतर यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. मठ संस्थांनच्या वतीने नियोजन दरवर्षी करण्यात येते. सद्गुरु नी संजीवन समाधीकडे सर्व सदभक्तांसाठी आरोग्य चांगले राहावे, सर्व संकट दूर व्हावे सर्व सदभक्तांची प्रगती व्हावी. व सदभक्त आई-वडिलांची सेवा करावी. आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. असे सद्गुरूंनी संजीवन समाधीस्थ सद्गुरूंना प्रार्थना केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा