वाल्मीक कराड समर्थकांचे केज तालुक्यात आंदोलन: राजेगाव फाट्यावर टायर जाळून रास्ता रोको
केज.....मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची संपूर्ण राज्यभर चर्चा असुन आवादा कंपनीच्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले व मकोकांतर्गत गुन्ह्यात समावेश करण्यात आलेले वाल्मीक कराड यांच्या समर्थनार्थ परळी सह बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. केज तालुक्यातच 100 फूट उंच असलेल्या पाण्याच्या टाकीवर एक दिव्यांग व्यक्ती सकाळपासून जाऊन बसला आहे. वाल्मीक कराड यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी त्याने केली आहे. त्याला खाली उतरविण्यासाठी पोलीस त्याची मनधरणी करत आहेत. आता या आंदोलनाला पाठिंबा म्हणून केज ते नांदूरघाट मार्गावर राजेगाव फाट्यावर टायर जाळून रास्ता रोको करण्यात येत आहे.
केज ते नांदूरघाट मार्गावर वाल्मीक कराड यांच्यावरील गुन्हे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी तसेच नाना चौरे नावाचा एक तरुण पाण्याच्या टाकीवर चढलेला असून त्याला समर्थन देण्यासाठी गावकऱ्यांनी राजेगाव फाट्यावर रस्त्यावर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सहभागी असेलेल्या तरुणांनी खा. बजरंग सोनवणे, आ. संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी सुरू केलेली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा