तपासासाठी तीन पथकं.. ज्वारीत सापडला आरोपी!
दिवसाढवळ्या घरात घुसून केला गोळीबार:'प्रेमवेड्या' आरोपीला रेणापूरातील ज्वारीच्या शेतातून पकडले !
अंबाजोगाईतील गोळीबाराचं कारण आलं समोर
अंबाजोगाई, प्रतिनिधी....
अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरात असलेल्या माऊली नगर मध्ये रहात असलेल्या नवनाथ कदम यांच्या मुलावर एका युवकाने गोळीबार करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.यात जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेले नसले तरी या घटनेने शहरात खळबळ उडाली.या घटनेनंतर पोलीसांनी तातडीने शोध घेत तीन पथकांद्वारे जलद गतीने आरोपीला शस्त्रासह ताब्यात घेतले आहे.खळबळ उडवून देणारी गोळीबाराची घटना ही प्रेमवेडातून घडली असल्याचे कारण आता पुढे आले आहे.
नेमकं घडलं काय?
या प्रकरणातील फिर्यादी २२ वर्षिय तरुणी व आरोपी गणेश पंडित चव्हाण रा.गोविदनगर रेणापूर याचे मागील तीन वर्षापासुन प्रेमसंबंध होते. आरोपी नेहमी फिर्यादीस त्रास देत असल्याने फिर्यादीने आरोपीस आँगस्ट 2023 पासुन बोलणे बंद केले होते. तरी पण आरोपी हा फिर्यादीस फोन करुन माझ्याशी बोलली नाहीस तर तुला व तुझ्या घरच्याना जिवे मारुन टाकीन अशी फोनवरून धमकी देत असायचा.
आज दि. 17.1.2025 रोजी सकाळी 9.36 ते 9.45 वाजणेच्या दरम्याण आरोपीने फिर्यादीचे घराचा दरवाजा वाजवला व आरोपी हा फिर्यादीचे आईला दरवाजा उघडा असे म्हणत होता. आईने दरवाजा उघडला नाही. त्याचे भीती पोटी फिर्यादी मुलगी,आई व भाऊ असे बेडरुममध्ये गेले. तेव्हा आरोपी हा दरवाजा वाजवत असताना फिर्यादी मुलीचा भाऊ सिध्देश्वर कदम हा हॉलकडे आला व खिडीक बंद करीत होता. आरोपी म्हणाला तु कशाला आलास निघुन जा असे म्हणुन खिडकी बंद करून बेडरूमकडे येत असतांना आरोपी गणेश चव्हाण यांने त्याचेकडील पिस्टलने गोळी झाडली. ती गोळी खिडकीचे काचामधुन पडद्याला छिद्र पाडून आत येऊन सोफ्यामध्ये घुसली. आरोपी गणेश चव्हाण यांने फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याच्या उद्देशाने पिस्टलने गोळी मारुन फिर्यादी व तिचे कुटुंबीयांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि कांबळे यांचेकडे देण्यात आला.
तपासासाठी तीन पथकं.. ज्वारीत सापडला आरोपी
गोळीबाराची घटना अंबाजोगाईत घडल्याचे वृत्त वाऱ्यासारखे सर्वत्र पसरले. एकच खळबळ माजली. या खळबळजनक घटनेतील आरोपीला ताब्यात घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले. आरोपीचा शोध घेण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके रवाना करण्यात आली. या तपास पथकांनी आरोपीचा माग काढून आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवले. आरोपी हा रेणापूर येथील शेतामध्ये ज्वारीत लपून बसलेला होता. या ठिकाणाहून अंबाजोगाई, बर्दापूर व रेणापूर पोलीस ठाण्याच्या पथकांनी त्याला शस्त्रासह ताब्यात घेतले.
अफवांवर विश्वास ठेवू नये - अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके
दरम्यान गोळीबाराची ही घटना प्रेम संबंधाच्या कारणातून घडलेली असून त्याच्याकडील पिस्टल हे विनापरवाना आहे.याबाबत कोणत्याही अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत शस्त्रासह आरोपी ताब्यात घेतला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा