राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र मस्के
बीड ....राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड राजेंद्र मस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी आजवर आपण दिलेले योगदान लक्षात घेऊन आपली महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी बीड जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्वशक्तीनिशी योगदान द्याल असा मला ठाम विश्वास वाटतो. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा. श्री. शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा