परळी तालुक्यातील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांना मुदतवाढ द्यावी- मनसेची मागणी
परळी तालुक्यात शासकीय हमीभावा प्रमाणे सोयाबीन खरेदी केंद्र चालु करण्यात आले आहे परंतु अनेक शेतकरी अद्यापही प्रतिक्षेत आहेत. शासनाने सोयाबीन खरेदी करण्याची तारीख संपत आलेली असतांना रांगेत असलेले शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत, त्यामुळे शेतकर्यांच्या मालास योग्य तो न्याय मिळावा म्हणुन खरेदी केंद्राची मुदत एक महिन्यांनी वाढवावी व शेतकर्यांची कर्जमा़फी तात्काळ जाहीर करावी या मागणीसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसील प्रशासना मार्फत निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी मनसे जील्हाउपाध्यक्ष दत्ता दहीवाळ, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, तालुकाउपाध्यक्ष विठ्ठलदादा झिल्मेवाड,ऋषिकेश बारगजे, शहरउपाध्यक्ष प्रशांत कामाळे,माणीक लटिंगे,महेश शिवगण,कोंडिबा कुकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा