जिल्हा प्रशासनाकडून दलित आंदोलकांची फसवणूक केल्याचा आरोप

बीडमध्ये धक्कदायक प्रकार उघड : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्यांना भेटायला आले 'फेक अधिकारी' !

जिल्हा प्रशासनाकडून दलित आंदोलकांची फसवणूक केल्याचा आरोप

 बीड, प्रतिनिधी...

      बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसापासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या उपोषण स्थळावर आज वरिष्ठ अधिकारी म्हणून आंदोलन सोडविण्यासाठी भेट द्यायला आलेले अधिकारी त्यांच्या त्यांच्या ओळखपत्राप्रमाणे नसल्याचा प्रकार समोर आला. या आंदोलनकर्त्यांनीच याचा भांडाफोड केला आहे. जिल्हाधिकारी व प्रशासनानेच अशा प्रकारे बोगसगिरी करून आंदोलकांची दिशाभूल व फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

     बीड रेल्वे स्थानकाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, त्याचबरोबर दादर येथील रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी रेल्वे स्थानक असे नाव द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे.  या आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने दलित समाज बांधव सहभागी होते.या अनुषंगाने या आंदोलनकर्त्यांना भेट देण्यासाठी व त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावे अशा प्रकारची मागणी होती. या संदर्भाने बीड जिल्ह्यातील महसूल प्रशासनातीलच काही लोकांना बोगस ओळखपत्र देवून त्याआधारे वरिष्ठ अधिकारी असे भासवत या आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यात आली. वरिष्ठ अधिकारी असल्याचे दाखवत या ठिकाणी हे आंदोलन सोडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र या आंदोलकांनीच याचा जागेवरच भांडाफोड केला असुन ज्या अधिकाऱ्यांना जी ओळखपत्रं होती त्या ओळखपत्रानुसार त्यांची नावे नव्हती. तर ते बनावट वरिष्ठ अधिकारी म्हणूनच आले आणि आंदोलनकर्त्यांची त्यांनी फसवणूक केली असा आरोप या आंदोलकांनी केला आहे. दरम्यान ओळखपत्र व वास्तविक ओळख यामध्ये तफावत असल्याचा जागेवरच भांडाफोड झाल्याने या अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाने दलित समाजाची घोर फसवणूक केली असुन अशा प्रकारे प्रशासनात प्रशासनामार्फतच बोगसगिरीचा फंडा वापरला जात असेल तर याच्या मुळापर्यंत जाऊन संबंधितांना कठोर कारवाई करावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार