सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे यांचं आवाहन
आज मुंडे परिवाराचा मकरसंक्रांत हळदी कुंकवाचा कार्यक्रम ; महिला भगिनींनी उपस्थित रहावे - सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे
परळी वैजनाथ, प्रतिनिधी - दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंडे परिवाराच्या वतीने परळीत भव्य दिव्य मकर संक्रांती निमित्त शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मकर संक्रांत हळदी कुंकू कार्यक्रमाला महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सौ राजश्रीताई धनंजय मुंडे यांनी केले आहे.
महिला ज्या सणाची आवर्जुन वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकरसंक्रांत. सौ राजश्रीताई धनंजय मुंडे या नेहमीच परळीत विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम घेत असतात विशेषतः महिलांसाठीच्या सर्व सणावारांमध्ये त्या स्वतः सहभागी होत असतात. दरवर्षी मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मुंडे परिवाराच्यावतीने मकर संक्रांत हळदीकुंकू कार्यक्रम आज शुक्रवार, ३१ जानेवारी २०२५ दुपारी ३:०० ते रात्रौ ९:०० परळी शहरातील महिलांसाठी तर दि. ०१ फेब्रुवारी शनिवार रोजी परळी तालुक्यातील व मतदारसंघातील महिलांसाठी "पंढरी", ना.धनंजय मुंडे यांचे निवासस्थान, सिंचन भवन समोर, अंबाजोगाई रोड, परळी वैजनाथ येथे होणार आहे.हळदी कुंकू कार्यक्रमाला महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सौ राजश्रीताई धनंजय मुंडे,सौ. मनिषा अजय मुंडे,सौ. सरिता विजय मुंडे सौ. अमृता रामेश्वर मुंडे सौ. सोनाली अभय मुंडे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा