"वैद्यनाथ" मधील निरोप समारंभात प्रा . डॉ.बोबडे यांचे उद्गार

वेळेचे नियोजन व प्रयत्नांच्या पराकाष्ठेने उच्च ध्येयाची प्राप्ती 

"वैद्यनाथ" मधील निरोप समारंभात प्रा . डॉ.बोबडे यांचे उद्गार              

परळी वैजनाथ- दि.१७-आजच्या स्पर्धात्मक युगात  शैक्षणिक गुणवत्ता साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टी ठेवावी. त्याबरोबरच वेळेचे सुयोग्य नियोजन करून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास उच्च ध्येय गाठणे सहज शक्य होते, असे विचार अभ्यासक प्रा. डॉ. तुकाराम बोबडे यांनी मांडले.

               येथील वैद्यनाथ महाविद्यालयात आज (दि.१७) बारावी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित निरोप समारंभ व पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ .श्री बोबडे बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ए.आर. चव्हाण होत्या. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य सर्वश्री प्रा. डी. के. आंधळे, प्रा. डॉ. व्ही. गायकवाड, प्रा. एच.डी. मुंडे, नॅक समन्वयक डॉ.व्ही.जे. चव्हाण, पर्यवेक्षक प्रा. डॉ.नयनकुमार आचार्य, विज्ञानविभाग समन्वयक प्रा. आर. कांदे, प्रा. एम‌. एल. देशमुख यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या शुभहस्ते प्रारंभी दीप प्रज्वलन करून समारंभाचे उद्घाटन झाले. 

              यावेळी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात डॉ. श्री बोबडे यांनी विद्यार्थी जीवनाचे महत्त्व विशद करून यशाचे पैलतीर गाठण्यासाठी आवश्यक त्या बाबीवर सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले की  ज्ञानाची विविध क्षेत्रे तितकीच महत्त्वाची असून योग्य त्याची निवड करून त्यात मोठ्या परिश्रमाने ‌‌ यशाचे पैलतीर गाठावे. मनाला एकाग्र बनवून उत्साहाने अभ्यासात दक्ष रहावे.   ध्येयनिश्चिती, मनाची एकाग्रता, आत्मविश्वास, अपूर्व कष्ट, वेळेचा सदुपयोग, परिस्थितीची जाणीव इत्यादी बाबी विद्यार्थ्यांनी सतत स्मरणात ठेवाव्यात. आळस किंवा प्रलोभन आले तर कधीही विचलित होता कामा नये. आई-वडिलांच्या उपकारांची जाणीव ठेवत नैतिक मूल्यांची जपणूक करावी. यामुळे निश्चितच सफलता प्राप्त होते.

   अध्यक्षीय समारोपात  प्राचार्या डॉ. ए. आर. चव्हाण यांनी ज्ञानात्मक कौशल्यांना केंद्रस्थानी ठेवून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उद्दिष्टे साधतांना सर्वांगीण विकासावर भर देण्याचे आवाहन केले.  यावेळी  शैक्षणिक गुणवत्ता संपादित केलेल्या व विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. वनरक्षक पोलीस कॉन्स्टेबल पदावर  नुकत्याच नियुक्त झालेल्या कु. रागिनी मुंडे हिचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कु.तेजस्विनी साबळे, कु.साक्षी जाधव, कु. वैष्णवी गीते, गजानन फड, कु.साक्षी कराड ,कु. रागिनी मुंडे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.. पाहुण्यांचा परिचय प्रा. टी.आर. हुरगुळे यांनी करून दिला. प्रास्ताविक प्रा. यु. आर. कांदे यांनी केले. प्रा.डा.व्ही.एम.मुंडे, प्रा.एम.एल. देशमुख यांनीही यावेळी विचार मांडले. सूत्रसंचालन  प्रा. आर. बी. शेटे व प्रा.यू. एल.कुरे यांनी केले, तर आभार प्रा. यु. आर. कांदे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार