परळीच्या भूमिपुत्राची कंपनी सुपा व अहिल्यानगर येथे उभारणार दोन प्रकल्प

 परळी तालुक्यातील भरत गित्ते यांच्या टॉरल इंडिया कंपनीचा दावोस मध्ये महाराष्ट्र शासनाशी करार

मंत्री धनंजय मुंडे यांनी पोस्ट शेअर करत भरत गित्ते यांचे समस्त परळीकर यांच्या वतीने केले अभिनंदन आणि कौतुक

परळीच्या भूमिपुत्राची कंपनी सुपा व अहिल्यानगर येथे उभारणार दोन प्रकल्प, बाराशे पेक्षा अधिक रोजगार निर्मिती, तर जागतिक स्तरावर निर्यात क्षम उत्पादने करणार तयार

मुंबई (प्रतिनिधी) - परळी तालुक्यातील नंदागौळ या छोट्याशा गावात जन्मलेले परळीचे भूमिपुत्र भरत गित्ते यांच्या टॉरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दाऊशे ते सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये महाराष्ट्र शासनाची दोन प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्याबाबत सामंजस्य करार केला असून, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी याबाबत पोस्ट शेअर करत भरत गित्ते व त्यांच्या टीमचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे. 


भरत गित्ते यांच्या टरल इंडिया या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुपा व अहिल्यानगर या ठिकाणी अत्याधुनिक ॲल्युमिनियम कास्टिंग सोल्युशन निर्माण करून ते जगभरात निर्यात करता येईल अशा पद्धतीचे प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी 500 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केली जाणार असून 1200 पेक्षा अधिक रोजगारांची याद्वारे निर्मिती होणार आहे. 


दरम्यान या ना त्याकारणाने मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या परळी तालुक्यातील नंदागौळ या छोट्याशा गावचे सुपुत्र असलेले भरत गित्ते यांनी आंतरराष्ट्रीय दर्जावर आपल्या टाॅरल इंडिया या कंपनीची छापून ठेवली असून त्या कंपनीचे महाराष्ट्र मध्ये दोन प्रकल्प उभारत रोजगार निर्मितीत तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देत असल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी अभिमान आणि आनंदाचा हा क्षण असल्याचे म्हणत भरत गित्ते यांचे कौतुक केले आहे. 


त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने टॉरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ही संधी उपलब्ध करून समस्त परळीकरांना हा बहुमान प्राप्त करून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांचे देखील धनंजय मुंडे यांनी आभार व्यक्त करत भरत गित्ते व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार