दर्पण दिनानिमित्त मनसेच्या वतीने परळीतील पत्रकारांचा सत्कार
परळी प्रतिनिधी.....
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका परळी वैजनाथच्या वतीने शहरातील पत्रकारांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
मनसेचे परळी तालुका प्रमुख श्रीकांत पाथरकर यांच्या गणेश पार रोड येथील संपर्क कार्यालयात दिनांक 6 जानेवारी दर्पण दिनी या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम ज्येष्ठ पत्रकार जी. एस.सौंदळे व पत्रकार धनंजय अरबुने यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित ज्येष्ठ पत्रकार जी .एस. सौंदळे, पत्रकार रानबा गायकवाड, पत्रकार प्रा.रवींद्र जोशी, पत्रकार धनंजय अरबुने, पत्रकार भगवान साकसमुद्रे, पत्रकार विकास वाघमारे, पत्रकार सचिन मुंडे, पत्रकार श्रीराम लांडगे यांचा पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पत्रकार रानबा गायकवाड, प्राध्यापक रवींद्र जोशी, भगवान साकसमुद्रे, धनंजय अरबुने यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत पाथरकर यांनी केले. या कार्यक्रमास मनसेचे तालुका उपाध्यक्ष विठ्ठलराव झिलमेवाड, ऋषिकेश बारगजे, कोंडीबा कुकर, बिरूदेव भंडारे, तसेच नरहरी लोखंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद लोखंडे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा