संजय खाकरे यांना बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा दर्पण पुरस्कार

 लोकमतचे संजय खाकरे यांना बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा दर्पण पुरस्कार


परळी वैजनाथ: प्रतिनिधी...
      बीड जिल्हा मराठी पत्रकारसंघाच्या वतीने दर्पण पुरस्कार जाहीर करण्यात आले असुन परळीतून लोकमतचे संजय खाकरे यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.लवकरच एका समारंभात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

           दरवर्षी देण्यात येणारे पत्रकारितेतील दर्पण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात लोकमतचे परळी वैजनाथ येथील प्रतिनिधी संजय खाकरे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या बीड जिल्हा शाखेच्या वतीने दर्पण दिनानिमित्त जिल्ह्यातील ११ पत्रकारांना तसेच एका वृत्तपत्र विक्रेत्यांना यावर्षीचा दर्पण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराची घोषणा पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि संस्थापक संतोष मानूरकर यांनी केली आहे.
           संजय खाकरे हे परळीतील प्रतिथयश पत्रकार आहेत. लोकमत ला १९९६ पासून परळी प्रतिनिधी म्हणून काम सुरू केले. परळीतील राख प्रदूषणाच्या बातमीस यापूर्वी उदगीर पत्रकार संघाच्या वतीने पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. त्यानंतर  धाराशिव पत्रकार संघाच्या वतीने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच परळी,अंबाजोगाई पत्रकार संघ, रोटरी क्लब परळी च्या वतीने सन्मान  करण्यात आलेला आहे. लोकमतच्या वतीने स्टार पत्रकार म्हणून अनेक  वर्ष गौरविण्यात आलेले आहे.
       बीड जिल्हा मराठी पत्रकारसंघाच्या वतीने दर्पण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संजय खाकरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !