यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती

 नेताजींचा त्याग आणि बाळासाहेबांचा विचार तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे"-प्राचार्य अतुल दुबे

यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.


परळी (प्रतिनिधी)

नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल दुबे यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन, धूप-दीप व पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यात आले.


प्राचार्य अतुल दुबे यांनी या वेळी मार्गदर्शन करताना म्हटले की, "नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्वातंत्र्य संग्रामातील त्याग आणि बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा तरुण पिढीला राष्ट्रसेवा आणि आदर्श जीवनासाठी प्रेरणा देते. त्यांच्या कार्यातून आम्ही सर्वांनी शिकण्याची गरज आहे."


कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. यु. एन. फड, प्रा. ए. डी. शेख, प्रा. एस. आर. कापसे, प्रा. पी. पी. तिडके मॅडम, प्रा. पी. पी. परळीकर, प्रा. ए. ए. मुंडे मॅडम, व्ही. एन. शिंदे, जी. व्ही. कांबळे, ए. बी. जगतकर, यु. बी. जगताप यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी नेताजींच्या स्वातंत्र्य चळवळीतल्या योगदानावर आणि बाळासाहेबांच्या समाजहितासाठी घेतलेल्या भूमिका यावर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही याप्रसंगी आपल्या विचारांमध्ये देशभक्तीची भावना दृढ करण्याचा संकल्प केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार