भावपूर्ण श्रद्धांजली !!!
व्यंकटराव कुलकर्णी यांचे निधन
लातूर दिनांक 24
लातूर येथील सावेवाडी भागातील श्री व्यंकटराव अण्णाराव कुलकर्णी मासुर्डीकर (90) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, नातू, दोन बहीण, एक भाऊ असा मोठा परिवार आहे.
भूकंपग्रस्त भागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाला होता. संपूर्ण औसा तालुक्यात ते तात्या नावाने प्रसिद्ध होते. ब्रेनटेक मल्टी सर्विसेसचे संचालक दत्तात्रय कुलकर्णी यांचे ते वडील होते व बीड जिल्हा शिवसेनाप्रमुख श्री शिवाजीराव कुलकर्णी यांचे सासरे होते. तर अंबाजोगाई येथिल सुप्रसिद्ध टेलर शाम कुलकर्णी यांचे मामा होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा