बीड जिल्हा सचिव पदी कॉ.एड. अजय बुरांडे यांची फेरनिवड
सामाजिक सलोखा व कष्टकऱ्यांच्या लढाईसाठी लाल झेंडा तेवत ठेवू - कॉ.अजित नवले
माकपचे मोठ्या उत्साहात जिल्हा अधिवेशन
बीड जिल्हा सचिव पदी कॉ.एड. अजय बुरांडे यांची फेरनिवड
परळी / प्रतिनिधी
भांडवलदारी दलदलीत कमळ खुलवण्यासाठी सर्वत्र जाती आणि धार्मिक द्वेषाचा चिखल उडवून
अस्मितेच्या राजकारणातून शोषणाचा पाया पक्का केला जात असताना सर्वसामान्य सर्वहारा जनतेचे मूलभूत प्रश्न राजकीय पटावर सातत्याने तेवत
ठेवत समाजात विर्जन घालणाऱ्या जातीवादी व धर्मांध ताकतीचे प्रस्त वाढत आहे. ते थोपवणे व पक्ष सभासदांनी जनमानसाला हतबलता न येऊ देण्यासाठी आपापसात प्रेमभाव वाढवून सर्व कल्याणाचा विचार पेरून लाल झेंडा तळपत ठेऊ असा विश्वास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी सदस्य कॉ.डॉ.अजित नवले यांनी व्यक्त केला.
क्रांतिकारी पक्ष म्हणून ओळख असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्ह्यात मोठा इतिहास असून स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीसह देशातील शेतकऱ्यांना पहिली कर्जमुक्ती मिळवून देणारे बीड जिल्ह्याचे माजी खासदार क्रांतीसिंह नाना पाटील, आपली सबंध हयात सर्वहरा वर्गाच्या उत्कर्षासाठी घालवणारे माजी खासदार कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे असं संघर्षमय वैचारिक वारसा असलेला माकप चे 24 वे बीड जिल्हा अधिवेशन परळी तालुक्यातील मोहा या ठिकाणी उत्साहात संपन्न झाले.
यावेळी जिल्हाभरातून आलेल्या पक्ष सभाससदांनी मागील तीन वर्षात आपण केलेल्या कृतीचा टीका, आत्मटिकात्मक आढावा घेऊन पुढील संघर्षाची दिशा निश्चित करण्यासाठी विचार मंथन केले. सोबतच पुढील तीन वर्षासाठी पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी बीड जिल्ह्यात शेतकरी आंदोलनाचा आवाज बनलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ.एड.अजय बुरांडे यांची पुढील तीन वर्षासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव म्हणून सर्वानुमते एकमुखी फेर निवड यावेळी करण्यात आली.
या अधिवेशनास संबोधित करताना पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. अजित नवले म्हणाले की, समाजात विर्जन घालणाऱ्या जातीवादी व धर्मांध ताकतीचे प्रस्त वाढत आहे. ते थोपवणे व पक्ष सभासदांनी जनमानसाला हतबलता न येऊ देण्यासाठी आपापसात प्रेमभाव वाढवून सर्व कल्याणाचा विचार पेरून, क्रियाशील होणे जरुरीचे असल्याचे प्रतिपादन केले. प्रेममय हृदय, विचारशील डोके, आणि कृतिशील हातपाय याच गोष्टी आपल्याला तारणाऱ्या आहेत. समस्त मानव जातीलाही तारणाऱ्या आहेत. म्हणून आणखी त्वेषाने विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोकरदार वर्गात मिसळूया लाल झेंडा पुढे घेऊन जाऊया हा विचार मांडला.
यावेळी नवनिर्वाचित बीड जिल्ह्याचे सचिव कॉ.एड.अजय बुरांडे यांनी सर्व आघाड्या मजबूत करून निर्भीडपणे आपला विचार पुढे घेऊन जाण्याचा व सर्व सामान्य माणसाला दिलासा देण्याचा वसा उचलण्याचा नारा दिला. सर्व आघाड्या इथून पुढे आणखी आक्रमकपणे कामात उतरतील आणि लोकांना दिलासा देणाऱ्या या क्रांतिकारी पक्षाची धुरा पुढे नेतील असा विश्वास व्यक्त केला.
अधिवेशन काळात अध्यक्ष मंडळ म्हणून कॉ.दत्ता डाके,कॉ.गंगाधर पोटभरे, कॉ.मीरा शिंदे यांनी काम पाहिले तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटी कडून कॉ. अजित नवले, कॉ किसन गुजर, कॉ. विजय गाभणे व कॉ. मालुसरे यांनी निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पडली या अधिवेशनास ज्येष्ठ कॉम्रेड पी एस घाडगे व कॉ.रोहिदास जाधव हे राज्य कमिटी सदस्य उपस्थित होते या अधिवेशनाची सुरुवात पक्षातील ज्येष्ठ कॉ.पी.एस नागरगोजे यांच्या हस्ते पक्षाचा ध्वज फडकवून झाली जिल्हाभरातून आलेले पक्षाचे अडीचशे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हे अधिवेशन संपन्न करण्यासाठी पक्षाच्या मोहा शाखेने परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा