प्रजासत्ताक दिनानिमित्त महेश अर्बन बँकेत चेअरमन ओमप्रकाश सारडा यांच्या हस्ते ध्वजवंदन
परळी वैजनाथ, (प्रतिनिधी):- येथील महेश अर्बन को.ऑप.बँकेत 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवार, दि.26 जानेवारी 2025 रोजी बँकेचे चेअरमन ओमप्रकाश सारडा यांच्या ध्वजवंदन करण्यात आले.
परळी शहरातील मुख्य बाजार पेठ येथे मुख्य कार्यालयात मोढा परीसरातील असुन याप्रसंगी बँकेचे मुख्य मार्गदर्शक प्रा.टी.पी.मुंडे सर, व्हाईस चेअरमन जनार्धन गाडे, संचालक शिवरत्न मुंडे, कृष्णा लोंढे, मीरा ढवळे, डॉ.टी.आर.गित्ते, भीमराव मुंडे, भरत अग्रवाल यांच्यासह बँकेचे सी.ओ.कचरुलाल उपाध्याय आदींसह बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
महेश बँकेच्या मुख्य इमारतीवर झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बँकेचे चेअरमन श्री ओमप्रकाश सारडा यांनी झेंडा वंदन करुन सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा