धार्मिक पर्वणी....

 परळीत प्रथमचश्री संत एकनाथ महाराज दर्शन त्रिदिवशीय प्रवचनमाला व किर्तन सोहळा- भास्करमामा चाटे

संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज श्री.ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी पैठणकर करणार विवेचन


परळी वैजनाथ, प्रतिनिधी... शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज श्री.ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांच्या सुमधूर वाणीतून परळीत प्रथमच श्री संत एकनाथ महाराज दर्शन प्रवचनमाला आयोजित करण्यात आली आहे.त्याचबरोबर किर्तन सोहळा होणार आहे. कलियुगातील भुकैलास परळी वैजनाथ येथे आयोजित या धार्मिक पर्वणीचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक भास्करमामा चाटे यांनी केले आहे.

          मुक्ताई लॉन्स मंगल कार्यालय, परळी-बीड रोड, चेंबरी रेस्ट हाऊसच्या बाजुला, परळी वैजनाथ, जि.बीड येथे मातृ-पितृ स्मृतीप्रित्यर्थ श्री संत एकनाथ महाराज दर्शन त्रिदिवशीय प्रवचनमाला  दि.३१/१/२०२५ ते दि.२/२/२०२५ या कालावधीत  दररोज  दुपारी १ ते ३ या वेळेत होणार आहे.शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी पैठणकर हे  कथाप्रवक्ते आहेत.कार्यक्रमाची रुपरेषा :दि.३१/१/२०२५/वेळ: १ ते ३: श्री संत एकनाथ महाराज चरित्र दि.१/२/२०२५/वेळ १ ते ३: श्री संत एकनाथ महाराज वाड्मयातील धर्मशास्त्रीय चिंतन,दि.२/२/२०२५/वेळ १ ते ३ श्री संत एकनाथ महाराज समग्र वाड्मय परिशीलन सायंकाळ सत्र: दि.३१/१/२०२५ वेळ ३ ते ५हरिकिर्तन:

श्री .ह.भ.प. अमोल महाराज गुट्टे (विषय संत रोहिदास, संत कबीरदास चरित्र),दि.१/२/२०२५ वेळ ३ ते ५

हरिकिर्तन: ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे(विषय महिला संतांचे कार्य) या कार्यक्रमास जगदीश सोनवणे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी उपस्थित राहतील.

      त्याचप्रमाणे या सोहळ्यात भगवानबाबा महिला भजनी मंडळ,अंबिका महिला भजनी मंडळ,शिवकन्या महिला भजनी मंडळ, स्वरांजलीला भजनी मंडळ, गुरुलिंग स्वामी महिला भजनी मंडळ, भक्तीस्वर साधना महिला मंडळ ,कालिका महिला भजनी मंडळ, दक्षिणमुखी हनुमान भजनी मंडळ, गीताई महिला भजनी मंडळ, तुकाराम महाराज महिला भजनी मंडळ,हरिहर महिला भजनी मंडळ कल्याणकारी महिला भजनी मंडळ

शंभु महादेव सेवाभावी महिला भजनी मंडळ, जिव्हेश्वर महिला भजनी मंडळ,वटसावित्री महिला भजनी मंडळ  जनाई महिला भजनी मंडळ टोकवाडी  माऊली महिला भजनी मंडळ संगम, मन्मथस्वामी महिला भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होईल.दि.२/२/२०२५ सांगता संतपुजन : सद्गुरु अनुराधाताई देशमुख,अर्जुन म.लाड गुरूजी, केशव म.उखळीकर,सुदाम म. पानेगावकर, तुकाराम म. मुंडे (शास्त्री)प्रभाकर म. झोलकर, संतोषानंद म. शास्त्री,दत्तात्रय म.पानगाव, राधाताई म.सानप नारायण म.पालमकर, भरत म. जोगी होणार आहे.दि.३१/१/२०२५ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेमध्ये ग्रंथ दिंडी मिरवणूक निघेल. या धार्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक सौ. शोभाभाताई भास्करराव चाटे (मामा),सौ. अर्चना श्रीकांत चाटे, सौ. वैशाली शशिकांत चाटे,डाॅ.सौ.. गौरी उर्फ स्वप्ना रविकांत चाटे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार