औष्णिक विद्युत केंद्र परळी वै : जाहीर सुचना
जाहीर सुचना: औष्णिक विद्युत केंद्र परळी वै. येथील राख बंधाऱ्यातील २०% राखीव राखेची विक्री
केंद्रीय पर्यावरण वनखात्याच्या अधिसूचनेनुसार व महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचा मंडळ ठराव दि.12.07.2024 खालील गोष्टीची पूर्तता करणाऱ्या प्रकल्प बाधित व्यक्ति / प्रकल्पामध्ये ज्यांची जमीन अधिग्रहण झालेले / वीट-उद्योग / लघु-उद्योग यांना परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या राख बंधारा क्रं-2 मधून उपलब्ध असलेल्या 72,646 मे.टन (20%) राखेची उचल व वाहतुक करण्याची परवानगी सवलतीच्या दरात 100 रु प्रती मे.टन देण्यासाठी खालील अटी पूर्ण करणाऱ्याकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. 1. अर्जदार हा प्रकल्प बाधित / प्रकल्पामध्ये ज्यांची जमीन अधिग्रहण झालेला / स्थानिक वीट उत्पादन करणारा असावा, बंधाऱ्यातील राखेचा उपयोग हा सीमेंट/वीट / टाईल्स /ब्लॉक / पाइप्स / फायबर सीमेंट शिट्स / बोर्डस् यासाठी करण्यात यावा आणि संबंधित दस्तावेज (करारनामा/विक्रीखत) कार्यालयात सादर करणे अर्जदारास बंधनकारक राहील. 2. अर्जदाराकडे प्रकल्प बाधित प्रमाणपत्र असावे, नसल्यास जमीन अधिग्रहण केलेले प्रमाणपत्र असावे. जमीन अधिग्रहण प्रमाणपत्र मधील फक्त एकच व्यक्ति ग्राह्य धरण्यात येईल, तसे नाहरकत प्रमाणपत्र त्यांनी इतरांकडुन घ्यावे. 2. अर्जदाराने अर्जामध्ये प्रती महिने वापरासाठी लागणाऱ्या राखेची मात्रा मे. टनामध्ये ठळकपणे नमूद करावी, सदर मात्रा आपल्या यांत्रिक उत्पादन क्षमतेच्या सुसंगत असावी. 3. अर्जदाराने अर्जासोबत खालील कागदपत्रे स्वः साक्षांकीत करुनच जोडावीत.3.1 जिल्हा उद्योग केंद्राचे विटा, ब्लॉक्स, टाईल्स व घर बांधकाम ई. बनविण्याचे प्रमाणपत्र (उद्योग आधार) 3.2 उद्योगाचे वस्तू व सेवा कर प्रमाणपत्र (GST Certificate). उद्योगाच्या किंवा मालकांच्या नावाचे पॅनकार्ड. 4 अर्जदाराकडे कमीत-कमी एक स्वतःची / भाडेतत्वावर घेतलेली जेसीबी / पोकलेन असावी, 20,000 लीटर चे एक पाण्याचे टँकर स्वतःचे / भाडेतत्वावर घेतलेले असावे, बंधारा मध्ये गस्ती करिता एक चार चाकी वाहन स्वताःचे / भाडेतत्वावर घेतलेले असावे. वाहनांची सर्व कागदपत्रे (वाहन नोंदणी प्रमाणपत्र, फिटनेस, इन्शुरन्स, व ड्रायव्हर्सची तपशीलवार कागदपत्रे). 5) प्रकल्प बाधित व्यक्ति / प्रकलपामध्ये जमीन गेलेले / स्थानिक वीट उद्योग / लघुउद्योग यांची पात्रतेचे सर्व निकष तपासण्याचे अधिकार या कार्यालयास आसून राखेची मागणी करणारी संख्या जास्त आल्यास सम प्रमाणात राख वाटप करण्यात येईल. 6) यशस्वी अर्जदारास सुरक्षा अनामत रक्कमेपोटी रु.1,00,000=00 (रुपये एक लाख फक्त) व ई. एम.डी 50,000 रु (रुपये पन्नास हजार फक्त) भरावे लागतील जे परतावा योग्य असतील व राख उचलण्याचा कालावधी / काम पूर्ण झाल्यावर सदरहू रक्कम परत दिली जाईल. तसेच अर्जदारास उचललेल्या राखेवर रु.100.00 प्रती मेट्रीक टन हे सवलतीचे शुल्क (concessional charges) म्हणून निर्धारित राखेच्या मात्रेप्रमाणे परळी औष्णिक विद्युत केंद्राकडे प्रत्येक महिन्यापूर्वी आगाऊ रक्कम म्हणून भरावे लागतील. 7) राख उचलण्याचा कालावधी हा विक्री आदेश निर्गमित झाल्यापासून 01 वर्ष पर्यंत असेल व खालील सही करणारे हे राख उचलण्याचा कालावधी कमी व जास्त करण्याचा अधिकार राखून ठेवतील. वरील राखेच्या विक्रीसंबंधी आदेश खंडित करणे वा रद्द करणे याबाबत संपुर्ण अधिकार या कार्यालयाने राखून ठेवलेले आहेत. वरील अटीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक अर्जदारांनी आपले अर्ज विहित नमुन्यात तसेच वर उल्लेख केलेली कागदपत्रे जोडून सीलबंद लिफाफ्यावर मुख्य अभियंता, औष्णिक विद्युत केंद्र, परळी यांचेकडे दि.10.02.2025 दुपारी 03.00 वाजेपर्यंत सादर करावेत. लिफाफ्यावर अर्जदाराचे नाव / उद्योगचे नाव / संपर्क क्रमांक व "राख बंधाऱ्यातील 20% राखेसाठी अर्ज" असे नमूद करावे.
टिप:- विहित नमुन्यातील अर्जाचा नमूना राख उपयोगिता विभागामध्ये उपलब्ध आहे.
-मुख्य अभियंता औ. विद्युत केंद्र परळी-वै-
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा