परळी पोलीस ठाण्यासमोरील वाल्मीक कराड समर्थकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित  !

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

         परळी पोलीस ठाण्यासमोरील वाल्मीक कराड समर्थकांचे आंदोलन रात्री ९ वा सुमारास तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. उद्या सकाळी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी आंदोलनाला भेट देवून  निवेदन स्वीकारले आहे.

       मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत आहे.याअनुषंगाने आवादा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले वाल्मीक कराड यांच्यावर अन्याय होत असून माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी करत वाल्मीक कराड यांच्या आईने परळी पोलीस ठाण्यात ठिय्या सुरू केला आहे. त्यानंतर वाल्मीक कराड समर्थकांकडून परळीत दिवसभर आंदोलन सुरुच होते.रात्री ९ वा सुमारास हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. उद्या सकाळी दहा वाजता पुन्हा पोलीस स्टेशन समोर आंदोलन केले जाणार आहे. त्या संदर्भातली अगोदर बैठक घेऊ आणि आंदोलनाची दिशा ठरवू असे  सांगण्यात आले आहे. मात्र परळी बेमुदत बंदची हाक यावेळी देण्यात आलेली आहे. जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत परळी बंद ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलेला आहे.उद्या सकाळी दहा वाजता ची मिटिंग झाल्यानंतर बीड जिल्हा बंद करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.

          दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला .आंदोलकांच्या वतीने कायदेशीर तपासाबाबत जे काही निवेदन देण्यात आलेले आहे त्या निवेदनाचा स्वीकार करून आपण ते शासनापर्यंत पाठवू अशा प्रकारचे आश्वासन आंदोलकांना त आपण दिले आहे. कायद्याच्या अखत्यारीत राहूनच सर्व काही तपास केला जाईल. नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काळजी घ्यावी व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी चेतना तिडके यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार