भीमनगरात आला आरतीच्या रूपाने पहिला लाल दिवा !
परळीच्या शिरपेचात राज्य सेवेचा मानाचा तुरा:हमालाची पोरगी राज्य अधिकारी!
भीमनगरात आला आरतीच्या रूपाने पहिला लाल दिवा!
परळी प्रतिनिधी :- परळी शहरातील अतिशय सामान्य कुटूंबातील मुलगी आरती बोकरे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा 2023 दिली होती त्याचा निकाल नुकताच जाहिर झाला असून आरतीने त्या परीक्षेत यशस्वी गरुड झेप घेतली असून ती आता अन्न औषध या विभागात काम करणार असून तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
आरती बोकरे ही परळी शहरातील भीमनगर मधील अतिशय सामान्य कुटुंबातील असून तिचे वडील एक खाजगी दुकानात हमाल म्हणून काम करतात तर तिची आई ही महापारेषण वीज पुरवठा केंद्रात कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करते आशा परिस्थितीत तिने कोणत्याही प्रकारची क्लास ना कोणाचे मार्गदर्शन घेतले नाही फक्त आई वडील आणि समाजासाठी काम करण्याची जिद्द मनाशी बाळगून अतिशय कष्टने अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देण्याचं स्वप्न मनात ठेवून त्यावर मेहनत घेऊन राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत होणाऱ्या परिक्षा 2023 वर्षात दिली आणि त्याचा निकाल आता नुकताच लागला असून तिने कुटूंबाचे आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण केले आहे तिने लोकसेवा आयोगाच्या मार्फत अन्न आणि औषध विभागाची जवाबदारी मिळणार असून परळी शहराच्या शिरपेचात अजून एक तुरा आरतीने दिला असून परळीकराना तिचा सार्थ अभिमान आहे त्यातच भीमनगर मध्ये अनेक विध्यार्थी आणि मुलींना तिचा आदर्श मिळणार आहे कारण सामान्य कुटूंबातून तिने ही गरुड झेप घेतली असून जिद्द आणि परिस्थितवर मात देत तिने स्वतःचे आणि समाजासाठी काम करण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे वडील हमाल असून तिच्या कुटूंबाने तिला पूर्ण साथ सहकार्य काहीही कमी पडु न देता तिच्या पाहिलेल्या स्वप्नात शामिल होऊन खंबीरपणे पाठीशी उभे राहिले होते त्याचाच परिणाम तिला हे घवघवीत यश मिळाले आहे तिच्या रूपाने परळी शहरातील भीमनगरात पहिला लाल दिवा मिळाला आहे त्यात तिने मुली कुठेही कमी नाहीत याचा एक मोठा आदर्श निर्माण करून देऊन सर्व विध्यार्थी श्रम करणाऱ्याना एक मोठी उमीद दिली आहे तिच्या या यशाचे सर्व स्तरातून मनापासून कैतुक होत आहे आणि मित्र परिवार ,कुटूंब स्नेही, समाजातील लोकांनी तिचे स्वागत करून मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा