इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 मिलिंद माध्यमिक विद्यालय व मिलिंद ज्युनियर कॉलेज येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     नाथ शिक्षण संस्था संचलित मिलिंद माध्यमिक विद्यालय व मिलिंद ज्युनियर कॉलेज परळी वैजनाथ येथे आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 


यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक बी.जी कदरकर सर, मिलिंद ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री.शिंदे व्ही.एन., पर्यवेक्षक श्री.धायगुडे सर,जेष्ठ सहशिक्षक श्री.सुदाम कापसे व श्री.राठोड बी.जी.यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करून राष्ट्रगीत,प्रतिज्ञा गायनानंतर संविधान सारनाम्याचे सामुहिक वाचन करण्यात आले.त्यानंतर लगेच रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांची  ही रॅली गणेशपार रोड,सावतामाळी मंदीर परीसर, उखळवेस, भीमनगर, होळकर चौक,गणेशपार गणपती मंदिर ते परत मिलिंद माध्यमिक विद्यालय अशा मार्गाने काढण्यात आली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त मिलिंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कदरकर सर यांनी शुभेच्छा दिल्या. पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन केले तसेच मराठी,हिंदी व इंग्लिश भाषेत भाषणे केली.

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री.कदरकर सर, प्राचार्य श्री. शिंदे व्ही.एन.,पर्यवेक्षक श्री.धायगुडे सर, उप प्राचार्य श्री.इरफान शेख सर, जेष्ठ सहशिक्षक श्री.सुदाम कापसे व श्री.आचार्य ए.एस. यांच्या हस्ते अंतरवर्गीय स्पर्धेत तसेच हिंदी परीक्षेत यश मिळवलेल्या  विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

आजच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व संचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.नितीन व्हावळे सर यांनी केले. कार्यक्रमास मिलिंद माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!