राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवती शिबीराचे उद्घाटन
श्रमदान, स्वच्छतेचे महत्त्व राष्ट्रीय सेवा योजनेतून मिळते- तहसीलदार व्यंकटेश मुंडे
लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवती शिबीराचे सेलू (परळी) येथे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन
परळी वैजनाथ दि.२३ (प्रतिनिधी)
राष्ट्रीय सेवा योजनेमुळे समाजशिल वृती यातून जोपासली जाते, श्रमदान, स्वच्छतेचे महत्त्व राष्ट्रीय सेवा योजनेतून मिळते असे प्रतिपादन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले. ते लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष युवती शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोत होते.
येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या वतीने सेलू (परळी) येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवशीय विशेष युवती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नायबतहसीलदार बाबूराव रुपनर, संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन रामचंद्र (बाळू) फड,प्राचार्या विद्या देशपांडे, पत्रकार सुकेशनी नाईकवाडे, उपसरपंच धम्मानंद बचाटे, कवी अनंत मुंडे, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय गुट्टे, माधव दहिफळे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा, सावित्रीबाई फुले, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्यामराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना व्यंकटेश मुंडे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना शिबीरातून स्वच्छतेचे महत्त्व, श्रमदान करण्याची आवड निर्माण होते, वृक्षारोपण व संवर्धन करणे याचे प्रशिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांनी आपले करिअर करताना मेहनत घेतली पाहिजे.आपले ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.पत्रकार सुकेशनी नाईकवाडे यांनी बोलताना सांगितले की,समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही भावना राष्ट्रीय सेवा योजना शिबीरातून रुजते.पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील एकल महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तर कवी अनंत मुंडे म्हणाले की, प्रयत्न व्यक्तीला मोठे बनवते, अशक्य कोणतीच गोष्ट नसते फक्त प्रयत्नाची आवश्यकता आहे, गावात जावून गावातील संस्कार राष्ट्रीय सेवा योजनेतून मिळतात, शिबीरातून मुल्यसंस्कार घेऊन जावू या. यावेळी बालविवाह जनजागृती पोवाडा व कविता सादर केल्या. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी केला. प्रास्ताविक प्रा डॉ विनोद जगतकर यांनी तर आभार प्रा डॉ कल्याणकर यांनी मानले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ विनोद जगतकर, प्रा डॉ राजश्री कल्याणकर, प्रा डॉ प्रविण दिग्रसकर, प्रा डॉ शहाणे, प्रा विना भांगे, प्रा प्रविण फुटके यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा