भावपूर्ण श्रद्धांजली ..!
भारतीय लष्करातील जवान पंजाबमध्ये कार्यरत बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र राजेंद्र मुंडे यांना वीरमरण
बीड,प्रतिनिधी...
भारतीय लष्करातील कार्यरत जवान व केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील रहिवाशी राजेंद्र मुंडे यांना पंजाबमध्ये वीरमरण प्राप्त झाले आहे. शाहिद जवान राजेंद्र मुंडे यांचे शव दिल्लीतून उद्या (दि.१०) केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथे आणण्यात येणार आहे. उद्या त्यांच्यावर शासकीय इतमामात केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
भारतीय लष्करात सेवारत सैनिक राजेंद्र विक्रम मुंडे यांचे दिनांक ०९ जानेवारी २०२५ रोजी देशाची सेवा करत असतांना अल्पशा आजाराने आर्मी हॉस्पिटल नवी दिल्ली येथे निधन झाले.त्यांचे पार्थिव त्यांचे मुळ गावी केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथे आणण्यात येणार आहे. दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजता अंतिम संस्कार शासकीय इतमामात करण्यात येणार आहेत. भारतीय लष्करातील बीड जिल्ह्याच्या या भूमिपुत्राला वीरमरण प्राप्त झाले असुन या जवानाच्या वीरमरणाबद्दल सर्व स्तरातून शोकसंवेदना व्यक्त होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा