परचुंडी येथे सरपंच सौ. मीना गुरुलिंग नावंदे यांच्या हस्ते ध्वजारोहन उत्साहात साजरा

परळी वैजनाथ/प्रतिनिधी 

 दि. 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनानिमित्त जि. प.प्रा.शाळा परचुंडी येथे शाळेतील मुख्याध्यापक श्री आजले सर यांच्या हस्ते ध्वारोहणाचा कार्यक्रम पार पडला तसेच ग्राम पंचायत परचूंडी येथे गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ मीनाताई नावंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध खेळ , व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ,त्यामध्ये शाळेतील चिमुकल्यांनी विविध गुणदर्शनाचे प्रदर्शन करून गावाची शोभा वाढवली शाळेतील शिक्षक श्री नीलेवार सर यांनी विद्यार्थ्यांच्या डंबेल्स चे विविध प्रकार  सादर केले तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कु.तन्वी वैरागे , कु.स्वरा रुपणर  यांनी सर्वांचे मन मोहून घेतले.तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणामध्ये सूरज नेमाने,स्वरा रुपणर,नम्रता नेमाने,साक्षी पताळे,संभाजी सरांडे,रोहित व्हरकटे, गणेश पत्रावळे ई विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे भाषण सादर केले त्यानंतर गावचे ग्रामसेवक श्री दशरथ गोरे साहेब यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून अध्यक्षीय परवानगीने कार्यक्रमाची सांगता केली.सदरील कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक,सहशिक्षक, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सौ राणी गडदे मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले.कार्यक्रमाला गावातील शिक्षणप्रेमी नागरिक वरिष्ठ मान्यवर ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी शिक्षिका सौ. आशा ताई नावंदे, व सर्व कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात महिला भगिनी व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !